मुंबई, 06 डिसेंबर: सध्या सर्वत्र चर्चा आहे अल्ट बालाजी (ALTBalaji ) आणि झी 5च्या (ZEE5 ) नव्या वेब सीरिजची. अल्ट बालाजीने नुकताच या वेब सीरिजचा टीझर लाँच केला आहे. पौरषपूर (Paurashpur) असं या वेब सीरिजचं नाव आहे. या सीरिजचं विशेष आकर्षण ठरतोय तो मिलिंद सोमणचा किलर लूक. नोजरिंग, धोतर, लांब केस, हातात तलवार, कपाळाला कुंकू या लूकवर त्याचे चाहते फिदा झाले आहे. अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) या सीरिजमध्ये बोरीस हे पात्र साकारत आहे. बोरीस हा एक ट्रान्सजेंडर दाखवण्यात आला आहे. ज्याला महिलांना मिळणाऱ्या असमान वागणुकीबद्दल चीड असते. टीझरवरुन तरी याची कथा भन्नाट असल्याचं दिसतंय. आता चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे. पौरषपूरच्या ट्रेलर आणि लाँचची.
टीझरमध्ये काय आहे खास?
भव्यदिव्य सेट, सत्तेसाठी होणारी लढाई, वासना, रक्ताने लाल झालेल्या तलावारी, प्रभावशाली संवाद, पुरुष आणि महिलांमधील असमानता असे अनेक पैलू या टीझरमध्ये दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या आधीच वेब सीरिजमधील मुख्य पात्रांचे लूक्स समोर आले आहेत. वेब सीरिजचा ट्रेलर 8 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
पौरषपूर या वेब सीरीजमध्ये मिलिंद सोमणसोबतच अभिनेत्री शिल्पा शिंदे, शाहीर शेख, साहिल सलाथिया आणि अन्नू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या शोचे दिग्दर्शन सचिंद्र वत्स हे करत आहेत. अन्नू कपूर यांच्या लूकचीही बरीच चर्चा सुरू आहे. मिलिंद सोमण काही दिवसांपूर्वी त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आला होता. याप्रकरणी तो बराच ट्रोलही झाला होता.