पाटणा, 01 फेब्रुवारी : शाहरूख खानच्या 'पठाण' सिनेमाला एकीकडे तीव्र विरोध होत आहे; मात्र दुसरीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधल्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा सिनेमा पाहून जेव्हा हा मुलगा सिनेमा हॉलच्या बाहेर पडला, तेव्हा काही मीडिया रिपोर्टर्सनी त्याला त्या सिनेमाबद्दल विचारलं. त्या मुलाने जे काही उत्तर दिलं, ते आता व्हायरल होत आहे.
त्याने सांगितलं, की 'मी या सिनेमाला विरोध करण्यासाठी आलो होतो; मात्र जेव्हा सिनेमा पाहिला, तेव्हा मात्र मी अक्षरशः वेडा झालो.' या तरुणाचं वक्तव्य असलेला हा व्हिडिओ खुद्द शाहरूख खाननेही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर पाटण्यातल्या या युवकाचा हा व्हिडिओ अनेक दिग्गजांनी शेअर करायला सुरुवात केली आणि तो व्हायरल झाला. त्या तरुणाचं नाव आहे सय्यद इरफान अहमद आणि त्याचे मित्र त्याला विरोधजीवी असं म्हणतात.
हेही वाचा - Rakhi Sawant: आईच्या निधनानंतर आता राखीचा संसार धोक्यात; हंबरडा फोडत म्हणाली 'माझं लग्न...'
सय्यद इरफान अहमद पाटण्यात राहतो. तो सांगतो, की विरोध करणं ही त्याची सवय आहे. 'मी घरातही विरोध करत असतो. पठाण या सिनेमाला विरोध करण्यासाठी मी सिनेमा हॉलच्या बाहेर आलो होतो; मात्र माझ्या मित्रांनी मला जबरदस्तीने सिनेमा दाखवला. सिनेमा पाहिल्यानंतर मला खूप छान वाटलं. बाहेर आलो, तेव्हा मीडियावाल्यांनी मला सिनेमाबद्दल विचारलं. त्यावर मी जे उत्तर दिलं, ते आता व्हायरल झालं आहे.' इरफानने या गोष्टीबद्दलही विरोधी मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, 'मला न विचारताच लोकांनी माझा व्हिडिओ शेअर केला; मात्र आता खूप जास्त प्रमाणात तो व्हायरल होऊ लागला, तेव्हा चांगलं वाटू लागलं. माझ्या विरोध करण्याच्या या सवयीमुळेट मला मित्र विरोधजीवी असं म्हणतात.'
इरफानने असंही सांगितलं, की जेव्हा त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, तेव्हा घरी त्याच्या वडिलांनी त्याला प्रचंड मारलं. या सिनेमात शाहरूख खानने जॉन अब्राहमलाही जेवढं मारलं नसेल, तेवढं आपल्याला वडिलांनी मारल्याचं इरफानने सांगितलं. असं झालं तरीही विरोध करण्यापासून तो मागे हटत नाहीये. तो म्हणतो, 'शाहरूख खानच्या आगामी 'जवान' या सिनेमालाही मी विरोध करणार आहे. कारण त्याचं नावच चुकीचं आहे. त्याशिवाय 'शहजादा' नावाचीही त्याची फिल्म येत आहे. त्याचं नाव प्रिन्स चार्ल्स असं का नाही.'
इरफानने असंही सांगितलं, की आधी तो फिल्म पाहतो आणि मगच विरोध करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Shahrukh Khan