मुंबई, 1 मे : देशात कोरोनाने(Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होतं आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांना (Tv Stars) सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ’पटियाला बेब्स’(Patiala Bebs) फेम अभिनेता अनिरुद्ध दवेला (Aniruddha Dave) सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अनिरुद्धने आपल्या सोशल मीडियावरून ही माहिती सर्वांना दिली होती. अनिरुद्धने ही माहिती 23 एप्रिल रोजी दिली होती. मात्र सध्या अनिरुद्धची तब्येत खुपचं बिघडली आहे. त्यामुळे त्याला ICU मध्ये हलवण्यात आलं आहे. यामुळे त्याचं कुटुंब आणि चाहते खुपचं चितेत आहेत.
View this post on Instagram
अनिरुद्धची पत्नी आणि अभिनेत्री शुभी अहुजाने अनिरुद्धसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट वाचून त्यांचे चाहते आणि मित्र खुपचं भावुक झाले आहेत. पोस्टमध्ये फोटो शेयर करत शुभीने अनिरुद्धच्या तब्बेतीबद्दल देखील सांगितलं आहे. तसेच या फोटोमध्ये तो आपल्या दोन महिन्यांच्या मुलासोबत दिसून येत आहे.
View this post on Instagram
फोटो पोस्ट करत अनिरुद्धच्या पत्नीनं लिहिलं आहे, ‘मी अनिरुद्धला भेटायला जात आहे. सध्या त्याची तब्येत ठीक नाहीय. तो कोरोनाशी लढा देत आहे. तो रुग्णालयात आहे, आणि त्याची तब्येत खुपचं गंभीर आहे. मला आमच्या 2 महिन्याच्या मुलाला, अनिश्कला सोडून जावं लागत आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण वेळ आहे. एकीकडे अनिश्कला आमची गरज आहे. कारण तो खुपचं छोटा आहे. तर दुसरीकडे मला अनिरुद्धजवळही जायचं आहे.
(हे वाचा:कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून अभिनेत्रीनी झाली आनंदी; म्हणाली, ‘आता तर...’ )
कृपया अनिरुद्धसाठी प्रार्थना करा. मी माझ्या कुटुंबाला, मित्रांना, ओळखीच्या लोकांना सर्व चाहत्यांना एकचं सांगू इच्छिते तुम्ही अनिरुद्धसाठी पप्रार्थना करा. त्यामुळेच तो बरा होऊ शकतो. अनिश्कच्या बाबांना तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. अशा आशयची पोस्ट त्याच्या पत्नीने लिहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Instagram post, Marathi entertainment, Tv actor