मुंबई, 05 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पठाण हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र प्रदर्शनाआधीच सिनेमा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमाच्या फर्स्ट लुकनंतर सिनेमाबद्दल उत्सुकता आणखी वाढली होती. मात्र त्यानंतर आलेल्या गाण्यांनी मात्र नवा वादंग निर्माण झाला आहे. पठाणमधील बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीनं देशभरातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं. सिनेमाचा वाद सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेश ( CBFC) पर्यंत पोहोचला. त्यांनी सिनेमातील गाण्यांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचे आदेश दिले. सिनेमातील काही सीन्स तात्काळ काढून टाकून त्यानंतर सिनेमा प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आता पठाण सिनेमातील बेशरम रंग या गाण्यात बदल करण्यात आलेत आहेत. गाण्यातील दीपिकाची भगवी बिकिनी काढून टाकण्यात आली आहे का जाणून घ्या.
बॉलिवूड हंगामानं दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या निर्मात्यांना बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीतील साइड पोज आणि क्लोज सीन्स तसंच 'बहुत तंग किया' या लिरिक्सवरील दीपिकाचे क्लोज काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता मीडिया रिपोर्टनुसार, गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीतील सीन्स काढून टाकण्यात आले आहे की नाही. पण या प्रकरणात CBFCचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी म्हटलं आहे की, पठाण सिनेमा CBFC च्या सगळ्या नियमांमधून गेला आहे. सिनेमात जे बदल करण्यास सांगण्यात आलं होतं ते बदल सिनेमाच्या रिलीज आधी नक्की लागू करण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा - प्लस साईज मॉडेलनं दीपिकाच्या 'बेशरम रंग' ची केली हुबेहूब कॉपी; पाहून नेटकरी म्हणाले...
View this post on Instagram
त्याचप्रमाणे सिनेमातील एका सीनमध्ये 'ब्लॅक प्रिझन रशिया' हा शब्द बदलून 'ब्लॅक प्रिझन' असं करण्यात आलं आहे. तसंच पठाण सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं U/A रेटिंग दिलं आहे. नेमकं किती मिनिटांचं किंवा सेकंदाचं फुटेज किंवा सीन्सना सेन्सॉर बोर्डानं कात्री लावली आहे याची माहिती समोर आलेली नाही.
पठाण या सिनेमातून अभिनेता शाहरुख खान 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. शाहरुख बरोबर अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे अभिनेता जॉन अब्राहमही प्रमुख भूमिकेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News