कोण करणार प्रियांकाचं कन्यादान? जाणून घ्या डिटेल्स

कोण करणार प्रियांकाचं कन्यादान? जाणून घ्या डिटेल्स

प्रियांका आणि निक लग्नबंधनात अडकणार आहेत. थोडाच अवधी शिल्लक राहिलाय. लग्नाचे अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : प्रियांका आणि निक लग्नबंधनात अडकणार आहेत. थोडाच अवधी शिल्लक राहिलाय. लग्नाचे अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय. प्रियांकाचं लग्न विधिवत होणार आहे, मग तिचं कन्यादान कोण करणार असा प्रश्न फॅन्सना पडलाय.

निक आपला भाऊ आणि वहिनीसोबत भारतात आलाय. जोधपूरचं उमेद भवन लग्नासाठी सजलंय. लग्नात प्रियांकाचं कन्यादान तिचे काका-काकी करणार आहेत. म्हणजे परिणिती चोप्राचे आई-वडील. रीना आणि पवन चोप्रा हे लग्नाचे विधी पार पाडणार आहेत. प्रियांका चोप्राचे वडील आता या जगात नाहीत.

जोधपूरचा किल्ला या लग्नासाठी सजवला जातोय.या लग्नात अगोदर कुणी फोटोग्राफर्सनी फोटोज काढू नयेत म्हणून एक चांगली शक्कल लढवलीय. लग्नात वधू-वर हेलिकाॅप्टरनं एन्ट्री करणार आहेत. त्यासाठी प्रियांका पहिल्यांदा मुंबईहून उदयपूरला जाणार. तिथून उम्मेद भवन पॅलेसमधून हेलिकाॅप्टरनं जोधपूरला लग्नाच्या ठिकाणी उतरणार.

29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत हेलिकाॅप्टर बुक केलं आहे. 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीनं तर 3 डिसेंबरला ख्रिशन पद्धतीनं लग्न होणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी मधू चोप्रा आधीच जोधपूरला गेल्यात.

हिंदू आणि ख्रिश्चन रीतिरिवाजामध्ये हे दोघे लग्न करणार आहेत. यात संगीत, लग्न आणि रिसेप्शन असे तीन कार्यक्रम असणार आहेत. या शाही जोडप्याचा विवाह मेहरानगड किल्ल्यावर होणार आहे.

मेहरानगड हा महाल या दोघांच्या विवाहासाठी सजवण्यात येणार आहे. हा महालाची किंमत जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला धक्का बसेल. तब्बल 60 हजार डॉलर म्हणजेच 43 लाख रुपयांना हा महाल बुक करण्यात आला आहे. राजा उम्मैद सिंह यांचा बनवलेला हा महाल आहे. आता हा ताज हॉटेलच्या मालकीचा आहे.

Video : 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये आणखी ट्विस्ट, शनायाच्या आयुष्यात नवी एंट्री

First published: November 28, 2018, 2:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading