मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /परिणीती चोप्राला नेटकऱ्यांनी का विचारलं, आपकी टूथपेस्ट में नमक हैं? तुम्हीच पाहा VIDEO

परिणीती चोप्राला नेटकऱ्यांनी का विचारलं, आपकी टूथपेस्ट में नमक हैं? तुम्हीच पाहा VIDEO

परिणीती चोप्राचा (Pariniti Chopra) व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ऊस खातानाचा पहिलाच अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

परिणीती चोप्राचा (Pariniti Chopra) व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ऊस खातानाचा पहिलाच अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

परिणीती चोप्राचा (Pariniti Chopra) व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ऊस खातानाचा पहिलाच अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अंबाला, 06 जानेवारी : बॉलिवूडमध्ये नाव गाजवून झाल्यानंतर आता प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अर्थात आपली देसी गर्ल हॉलिवूडमध्येही यशाची शिखरं गाठत आहे. प्रियांका चोप्राची बहीणदेखील मागे नाही बरं का. आम्ही बोलत आहोत परिणीती चोप्राबद्दल (Pariniti Chopra). परिणीती चोप्रादेखील लवकरच रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) अ‍ॅनिमल या चित्रपटात झळकणार आहे. सध्या परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. यात ती देसी लूकमध्ये दिसत आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

परिणीती चोप्राच्या व्हिडीओमध्ये ती चक्क ऊस खाताना दिसत आहे. ती पहिल्यांदाच ऊस खात आहे. त्यामुळे तिला पहिल्या फटक्यात ऊस तोडता येत नाही. हा व्हिडीओ अंबाला इथे शूट केलेला आहे. परिणीतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या व्हिडीओला काही तासांतच लाखो व्ह्यूज आले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी तिची मस्करीही केली आहे. काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिची मस्करी केली आहे. परिणीतीला ऊस खाता येत नव्हता म्हणून नेटकऱ्यांनी तिला एकापेक्षा एक भन्नाट प्रश्नही विचारले आहेत. काहींनी विचारलं आहे की, तुझ्या टूथपेस्टमध्ये मीठ नाही का? तर काहींनी कॉमेंट केली, 'हिच्या ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कापा.'

परिणीती चोप्राने आजपर्यंत अनेक चित्रपटातून काम केलं आहे. तिचा दावत-ए-इश्क, शुद्ध देसी रोमान्स, हसी तों फसी, केसरी, मेरी प्यारी बिंदू, नमस्ते इंग्लंड, इशकजादे असे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत.

First published:

Tags: Viral videos