3 जुलै : विपुल शाह दिग्दर्शित 'नमस्ते लंडन' सिनेमा प्रचंड हिट झाला होता. म्हणूनच शाहनं त्याच्या सिक्वेलची घोषणा केली होती.पण गेल्या 10 वर्षात याबद्दल काहीच ठोस कळलं नाही. आता मात्र हा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जातंय.
'नमस्ते इंग्लंड' असं या सिनेमाचं नाव असेल. मात्र यावेळी खिलाडी अक्षयकुमारच्या सोबत कतरिना कैफ नव्हे तर परिणिती चोप्रा झळकणार असल्याचं बोललं जातंय. 'सध्यातरी मी 'गोलमाल 4' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.पण मी लवकरच माझ्या आगामी सिनेमाची अधिकृत घोषणा करेन,' असं परिणितीनं सांगितलं.
परिणितीचा हा आगामी सिनेमा 'नमस्ते इंग्लंड'च असणार असल्याच्या शंका व्यक्त केल्या जातायत. असं जरी असलं तरी अधिकृत घोषणेशिवाय काही ठोस सांगता येणार नाही.गोलमाल 4 मात्र दिवाळीत रिलीज होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा