मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘ती महिलाच खरी दोषी...’; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी

‘ती महिलाच खरी दोषी...’; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी

झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीनं मला मारहाण केली असा खळबळजनक आरोप बंगळुरुमधील एका महिलेने केला. (order delay) ऑर्डर उशिरा आल्यामुळं त्यांच्यात वाद झाला होता.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 14 मार्च: झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीनं मला मारहाण केली असा खळबळजनक आरोप बंगळुरुमधील एका महिलेने केला. (order delay) ऑर्डर उशिरा आल्यामुळं त्यांच्यात वाद झाला होता. अर्थात हे आरोप त्या डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीनं फेटाळून लावले आहेत. उलट त्याच महिलेनं मला मारलं असा उलट आरोप त्यानं केला आहे. सध्या पोलीसांद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. (Zomato delivery boy) दरम्यान या डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा (Parineeti Chopra) पुढे सरसावली आहे. या व्यक्तीला मी कशी मदत करु? असा सवाल तिनं झोमॅटोला केला आहे.

नेमकं काय म्हणाली परिणीती?

“झोमॅटो इंडिया कृपया या प्रकरणातील सत्य शोधून काढा. आणि आलेला रिपोर्ट सार्वजनिक करा. जर तो व्यक्ती निर्दोष असेल तर त्या महिलेविरोधात कारवाई करण्यासाठी मदत करा. हा प्रकार अमानविय आहे. तो व्यक्ती निर्दोष असल्याची मला पुर्ण खात्री आहे. कृपया मी त्या व्यक्तीला कशी मदत करु शकते याबाबत मला मार्गदर्शन करा.” अशा आशयाचं ट्विट परिणीतीनं केलं आहे.

अवश्य पाहा - आ रही है पुलिस! बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ अखेर या दिवशी होणार प्रदर्शित

आरोप झालेल्या व्यक्तीचं नाव कामरान असं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 'द न्यूज मायनूट' या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, कामराजने दिलेल्या जबानीमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हितेशा चंद्राणी यांच्या घरी मी उशिरा पोहचलो. खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे मी उशिरा पोहचलो असं सांगून त्यांची माफी मागितली. त्यांनी (हितेशा) कॅश ऑन डिलिव्हरी (cash on delivery) हा पर्याय निवडल्याने मी त्यांच्याकडे पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी हितेशा यांनी जेवण ताब्यात घेतलं, पण आपण कस्टमर सपोर्टशी बोलत असल्याचं सांगून पैसे देण्यास नकार दिला,' असं कामराजनं सांगितलं.

First published:

Tags: Bollywood, Parineeti Chopra, Zomato