मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'रणवीर सिंह बनला बाबा?' चाहत्याच्या प्रश्नावर परिणीतीने अभिनेत्याला म्हटलं- Please Confirm!

'रणवीर सिंह बनला बाबा?' चाहत्याच्या प्रश्नावर परिणीतीने अभिनेत्याला म्हटलं- Please Confirm!

Ask Me Anything मध्ये परिणीतीच्या एका फॅनने प्रश्न विचारला की रणवीर सिंह पप्पा झाला आहे का? त्यावर परिणीतीने मजेदार उत्तर दिलं आहे.

Ask Me Anything मध्ये परिणीतीच्या एका फॅनने प्रश्न विचारला की रणवीर सिंह पप्पा झाला आहे का? त्यावर परिणीतीने मजेदार उत्तर दिलं आहे.

Ask Me Anything मध्ये परिणीतीच्या एका फॅनने प्रश्न विचारला की रणवीर सिंह पप्पा झाला आहे का? त्यावर परिणीतीने मजेदार उत्तर दिलं आहे.

मुंबई, 25 ऑगस्ट: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) हे कायमच चर्चेत असतात आणि त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यांचे फॅन असतील तर ते संधीच शोधत असतात त्या कलाकाराबद्दल अधिक जाणून घ्यायची. मग ते एखाद्या कलाकाराबदद्ल दुसऱ्या कलाकाराला प्रश्न विचारायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. त्यामुळे मजा होते. पण कलाकार हे पण जबरदस्त तयार असतात ते बरोबर समर्पक उत्तर देऊन फॅनना निरुत्तर करतात. असंच काहीसं झालंय रणवीर सिंहबाबतीत (Ranveer Singh). रणवीर सिंह नुकतंच त्याची बायको अभिनेत्री दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यानंतर दीपिका गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. रणवीरने याबाबत काहीही जाहीर केलेलं नाही. तरीही त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे की ही बातमी खरी आहे का? हे जाणून घ्यायची. मग काय त्यांनी जंग जंग पछाडायला सुरुवात केली.

अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) मंगळवारी आस्क मी एनिथिंग (Ask Me Anything) हे सेशन तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर आयोजित केलं होतं. या सेशनमध्ये सामान्य माणसं, फॅन आपल्या आवडत्या कलाकराला सोशल मीडियावर प्रश्न विचारू शकतात आणि ते त्यांची उत्तरं देतात. अशावेळी अनेक जण अनेक प्रश्न विचारतात पण ही कलाकार मंडळीही तशीच मजेदार उत्तरं देऊन धम्माल उडवून देतात. परिणीतीच्या एका फॅनने प्रश्न विचारला की रणवीर सिंह पप्पा झाला आहे का? त्यावर परिणीतीने मजेदार उत्तर दिलं आहे. तिने या प्रश्नासाठी इन्स्टाग्रामवर रणवीर सिंहला टॅग केलं आणि लिहिलं आहे की, 'रणवीर प्लीज कन्फर्म'.

दुसऱ्या एका फॅनने परिणीतीला सांगितलं की तू आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) चेहऱ्यावरून बहिणी वाटता. त्यावरही परिणीतीचं उत्तर छान होतं. परिणीतीनी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धांत कपूर यांना टॅग केलं आणि लिहिलं, ‘काय? मी सिदची (श्रद्धा कपूरचा भाऊ) जागा घेते आहे?’

हे वाचा-8 महिन्यांची गर्भवती असूनही नेहा धूपिया जोमात करतेय शूटिंग

परिणीतीचा ‘सायना’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. यामध्ये तिनी बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची (Saina Nehwal) भूमिका साकारली होती. आता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्यासोबत ‘ॲनिमल’ (Animal) या चित्रपटात परिणीती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First published:

Tags: Deepika padukone, Parineeti Chopra, Ranveer sigh