परिणिती चोप्राला बॉयफ्रेंडनं दिला धोका, भावुक होत मुलाखतीत उलगडलं सत्य

परिणिती चोप्राला बॉयफ्रेंडनं दिला धोका, भावुक होत मुलाखतीत उलगडलं सत्य

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये परिणितीनं तिची ब्रेकअप स्टोरी सांगितली.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा ‘जबरिया जोडी’च्या प्रमोशनमध्य व्यस्त आहे. या सिनेमाची रिलीज डेट आता एक आठवडा पुढे गेली असून त्यामुळे परिणितीला आणखी एक आठवडा प्रमोशन करावं लागणार आहे. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिनं तिची ब्रेकअप स्टोरी सांगितली. या ब्रेकअपमुळे तिचं पूर्ण आयुष्य उध्वस्त झाल्याप्रमाणे वाटू लागलं होतं. परिणितीनं यावेळी तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलं नाही मात्र तिनं ब्रेकअपनंतर तिचं आयुष्य कसं बदललं हे सांगितलं.

परिणितीचं नाव सध्या असिस्टंट डायरेक्टर चरित देसाईशी जोडली जातं. मात्र अद्याप परिणितीनं हे नातं अद्याप सर्वांसमोर स्वीकारलेलं नाही. ती नेहमीच या सर्व अफवा असल्याचं सांगताना दिसते. या आधीही परिणिती कधीच तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणानं बोललेली नाही. ही पहिलीच वेळ आहे की, परिणिती तिच्या ब्रेकअप बद्दल एवढी उघडपणे बोलली आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतल्या कलाकारांनी पर्यावरणासाठी उचललं 'हे' पाऊल

परिणितीनं ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत स्वतःची ब्रेकअप स्टोरी सांगितली. ती म्हणाली, तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी पूर्णपणे तुटले होते. मला वाटत होतं की मी या जगात एकदम एकटी पडले आहे. असं पहिल्यांदाच झालं होतं जेव्हा कोणी मला नकार देऊन निघून गेलं होतं. याआधी माझ्या आयुष्यात असं कधीच घडलं नव्हतं. यावेळी माझ्या घरच्यांनी मला खूप साथ दिली. मला त्यावेळी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा माझ्या घरच्यांची खूप गरज वाटत होती.

उन्नाव रेप केस : 'ट्विंकल खन्नाच्या 'या' ट्वीटमुळे खिलाडी अक्षय कुमार ट्रोल

ब्रेकअपनं बनवलं जास्त खंबीर

परिणिती सांगते, मी ब्रेकअपनंतर आणखी जास्त खंबीर आणि समंजस झाले. मी देवाची आभारी आहे की, की त्यानं माझ्या आयुष्या हा प्रसंग, ही वेळ खूप लवकर आणली. या ब्रेकअपमुळे मी बरंच काही शिकले.

शनायानं शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, 'हे' आहे कारण

कोण होता परिणितीचा एक्स बॉयफ्रेंड

परिणितीला जेव्हा तिच्या बॉयफ्रेंड बद्दल विचारण्यात आलं त्यावेळी तिनं त्या व्यक्तीचं नाव घेणं टाळलं. ज्यावेळी तिला ती व्यक्ती चरित देसाई आहे का असं विचारण्यात आलं त्यावेळी ती म्हणाली, मी गोष्ट नाकारतही नाही आणि स्वीकारतही नाही हे एक गुपित आहे.

परिणितीचा आगामी सिनेमा ‘जबरिया जोडी’ या आधी 2 ऑगस्टला रिलीज होणार होता मात्र त्यानंतर याची रिलीज डेट बदलण्यात आली. त्यामुळे आता हा सिनेमा 9 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याशिवाय परिणिती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. परिणितीनं मागच्या काही दिवसांपासून या सिनेमाची तयारी सुरु केली आहे.

===================================================================================

VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

Published by: Megha Jethe
First published: July 31, 2019, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading