मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Parineeti Chopra : 'कोड नेम तिरंगा' मध्ये 'या' पंजाबी गायकासोबत झळकणार परिणीती; धमाकेदार टिझर रिलीज

Parineeti Chopra : 'कोड नेम तिरंगा' मध्ये 'या' पंजाबी गायकासोबत झळकणार परिणीती; धमाकेदार टिझर रिलीज

Code Name Tiranga Teaser

Code Name Tiranga Teaser

परिणीती चोप्रा दमदार अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून ती त्याच्या आगामी 'कोड नेम तिरंगा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात ती प्रसिद्ध पंजाबी गायकासोबत झळकणार आहे.

  मुंबई, 22 सप्टेंबर : परिणीती चोप्रा दमदार अभिनेत्री आहे. तिने पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. त्यानंतर ती विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. पण आता ती तिच्या नवीन चित्रपटासह परतण्याच्या तयारीत आहे. पडद्यावर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्यानंतर परिणीती आता अॅक्शन अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती त्याच्या आगामी 'कोड नेम तिरंगा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात ती प्रसिद्ध पंजाबी गायकासोबत झळकणार आहे. परिणीती चोप्राचा आगामी चित्रपट 'कोड नेम तिरंगा'चा टीझर समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्रीची बेधडक स्टाईल पाहायला मिळतेय. टीझरमध्ये गायक-अभिनेता हार्डी संधू सुद्धा दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य असलेली त्याची एक झलक चाहत्यांची मने जिंकत आहे. त्याचवेळी हातात बंदूक घेऊन दुष्मनांवर गोळ्या झाडणारी परिणीती दिसत आहे. जखमी अवस्थेतही त्यांच्या चेहऱ्यावर लढण्याची ताकद आणि धैर्य दिसून येते. हातात बंदूक, रक्ताने माखलेली परिणीती चोप्रा चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@parineetichopra)

  हा चित्रपट एक स्पाय थ्रिलर प्रेमकथा असेल, ज्यामध्ये परिणीती रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केले असून दिग्दर्शन भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केले आहे. परिणीती-हार्डीशिवाय शरद केळकर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. हेही वाचा - Subodh bhave : सुबोध भावे साकारणार 'धर्माभिमानी हिंदूची' भूमिका; नवीन माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला कोड नेम तिरंगा' हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून परिणीती पुन्हा एकदा दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिकंण्यासाठी  सज्ज झाली आहे. 2021 मध्ये परिणीती चोप्राचा सायना रिलीज झाला होता, ज्यामध्ये श्रद्धा कपूर सायनाची भूमिका साकारणार होती, पण नंतर परिणीतीला ही भूमिका मिळाली. हा सायना नेहवालचा बायोपिक होता ज्यात अभिनेत्रीला चांगलीच पसंती मिळाली होती पण त्यानंतर परिणीतीचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. याशिवाय ती सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘उंचाई’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी डेन्झोंगपा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Parineeti Chopra

  पुढील बातम्या