सायना नेहवालच्या बायोपिकचं शूटिंग पुन्हा लांबलं, जाणून घ्या काय आहे कारण

सायना नेहवालच्या बायोपिकचं शूटिंग पुन्हा लांबलं, जाणून घ्या काय आहे कारण

सुरुवातीला या सिनेमासाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली होती मात्र तिच्या बीझी शेड्यूलमुळे तिनं हा सिनेमा सोडला आणि त्यामुळे शूटिंग लांबणीवर पडलं होतं.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : अभिनेत्री परिणीती चोप्रा मागच्या काही काळापासून तिचा आगामी सिनेमा सायना नेहवाल बायोपिकच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती भारताची स्टार क्रिकेटपटू सायना नेहवालची भूमिका साकरणार आहे. सुरुवातीला या सिनेमासाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली होती मात्र तिच्या बीझी शेड्यूलमुळे तिनं हा सिनेमा सोडला आणि त्या ठिकाणी परिणीतीची वर्णी लागली. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून ती बॅडमिंटनचे धडे घेत आहे. पण या ट्रेनिंग दरम्यान परिणीतीला दुखापत झाली असून याची माहिती तिनं स्वतःच सोशल मीडियावर शेअर केली आहे.

परिणीतीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात ती पाठमोरी बसलेली असून तिच्या मानेवर निळ्या रंगाच्या पट्ट्या लावलेल्या दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना परिणीतीनं लिहिलं, मी आणि ‘सायना’ची पूर्ण टीम प्रयत्न करत होती की मला दुखापत होऊ नये पण काही तरी गडबड होतेच. मी जेवढा होईल तेवढा आराम करुन पुन्हा बॅडमिंटन खेळायला सुरुवात करेन.पण परिणितीला दुखापत झाल्यानं या बायोपिकचं शुटिंग पुन्हा एकदा लांबणीवर पडलं आहे.

दिशा पटनीचा 'हॉट' PHOTO व्हायरल, टायगरच्या बहिणीने दिली 'ही' प्रतिक्रीया

परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःला फिट बसवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि यासाठी ती खूप मेहनतही घेत आहे. याशिवाय ती सायनाच्या आयुष्याविषयी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ती काही दिवसांपूर्वीच सायनाला भेटायला तिच्या हैदराबादमधील घरी गेली होती. त्यांच्या या भेटीचा फोटो सुद्धा तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

Bigg Boss 13: 'मोठ्या ओठांची पाल' म्हटल्याने भडकली माहिरा शर्मा

 

View this post on Instagram

 

30 more days to be her ... and live her!! 🌺 #SainaNehwalBiopic @nehwalsaina 🏸

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

परिणीतीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर यावर्षी रिलीज झालेला तिचा 'केसरी' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला होता. तिनं या सिनेमात अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली होती. याशिवाय तिच्याकडे हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आहे. तसेच 'फ्रोजन 2' मध्ये सुद्धा आवाज देणार आहे.

अजय देवगणच्या 'तानाजी' चित्रपटाबद्दल मालसुरेंच्या वंशजांचा मोठा खुलासा

==============================================================

Special Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन

Published by: Megha Jethe
First published: November 16, 2019, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading