'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का!

'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का!

अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज 31 वा वाढदिवस. 'लेडिज व्हर्सेस रिकी बहेल' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या परिणीला मध्यंतरीचा काळात डिप्रेशनचा सामना करावा लागला होता.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज 31 वा वाढदिवस. आज बॉलिवूडमध्ये तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 2011मध्ये लेडिज व्हर्सेस रिकी बहेल या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या परिणीला मध्यंतरीचा काळात डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. एवढंच नाही तर त्यावेळी तिच्याकडे कोणताही नवा सिनेमा नव्हता. हातातले पैसे संपले होते. पण या सगळ्यावर मात करत तिनं आपलं करिअर सावरलं आणि आज बॉलिवूडमध्ये तिनं स्वतःला सिद्ध केलं आहे. केसरी या सिनेमाच्या रिलीजनंतर दिलेल्या एका मुलाखतीत परिणीतीनं तिच्या खासगी आयुष्यातला एक नाजूक कोपरा उलगडला होता.

'ते सहा महिने मी इतकी डिप्रेस्ड होते की, दिवसातून 10 वेळा रडायचे. मी आयुष्यात पुन्हा उभी राहूच शकणार नाही, असं वाटायला लागलं होतं. मी सलग सहा महिने मीडियापासून दूर होते. नवे सिनेमे साइन केले नाहीत की कुठे परफॉर्म केलं नाही. नीट खाणं नाही, झोप नाही, छातीवर दडपण यायचं... वाटायचं आता सगळं संपलं!...' हे अनुभव सांगितले आहेत प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातही असं टोकाचं नैराश्य येऊ शकतं यावर विश्वास बसणार नाही. पण परिणीतीनं स्वतःच याविषयी एका कार्यक्रमात सांगितलं.

मतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं

काही दिवसांपूर्वी एका टॉक शोमध्ये नैराश्यग्रस्त अवस्थेबद्दल पहिल्यांदाच परिणीता उघडपणे बोलली. 2014-15 मध्ये आपण डिप्रेशनमध्ये गेलो होतो, असं परिणीतीने सांगितल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं होतं. "त्या काळात आयुष्यात सकारात्मक काहीच घडत नव्हतं. ‘दावत ए इश्क’ दणकून आपटला होता. हातात नवा प्रोजेक्ट नव्हता, पैसा संपत आला होता. त्यात माझं ब्रेकअप झालं. रिलेशनशिपमध्येही दुःख आलं..." परिणीती सांगते.

Tanaji : अजय-सैफचा First Look आउट, या दिवशी सिनेमा होणार रिलीज

2014 पर्यंत परिणीतीचे इशकजादे, लेडिज व्हर्सेस रिकी बहेल, शुद्ध देसी रोमान्स यासारखे तीन हिट सिनेमे येऊन गेले होते. ती म्हणाली, मी भरपूर पैसा कमावला होता. घर घेतलं होतं. अचानक सगळं हातातून जातंय असं वाटायला लागलं. "या काळात मी सहा महिने सगळ्यापासून दूर होते. घरी बसून टीव्ही बघायचा, जाईल तेवढं खायचं एवढेच उद्योग होते. मित्र-मैत्रिणी एवढंच काय घरच्यांपासून पण मी दूर होते. दोन आठवड्यातून एखादा फोन घरी व्हायचा." पण या काळात भाऊ सहेज चोप्रानं मला साथ दिली. या वाईट काळातून बाहेर यायला त्यानंच मदत केली, असंही परिणीती सांगते. स्टायलिस्ट संजना बत्रा या आपल्या मैत्रिणीचाही परीने उल्लेख केला. तिच्यामुळे आणि भावामुळे आपण नैराश्यातून बाहेर येऊ शकलो, असं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

Stop to smile! (Hiding my film costume under that shawl) #NamasteEngland

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

"मी त्या वेळी 25 वर्षांची होते आणि अगदी धोकायदायक नाजूक अवस्थेत होते. हळूहळू त्यातून बाहेर पडले. नवे सिनेमे साईन केले आणि आयुष्य पुन्हा एकदा आत्मविश्वासाने हातात घेतलं." नैराश्यातून बाहेर पडणारी आणि त्याबद्दल उघडपणे बोलणारी परिणीता पहिली अभिनेत्री नाही. अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण या दोघींनी यापूर्वीच मानसिक तणाव आणि आजारांबद्दल जाहीरपणे सांगितलं आहे. दीपिकाने तर डिप्रेशनवर रीतसर ट्रीटमेंट घेतली होती. अनेक जण नैराश्यग्रस्त होतात. पण इतर आजारांसारखा त्यावर लगेच इलाज केला जात नाही. या गोष्टी लपवण्याकडे अजूनही कल असतो.

SEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...

==============================================================

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

First published: October 22, 2019, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading