Home /News /entertainment /

VIDEO: यश नेहाच्या साखरपुड्यातील परीचं गोड गाणं, नक्की ऐका

VIDEO: यश नेहाच्या साखरपुड्यातील परीचं गोड गाणं, नक्की ऐका

VIDEO: यश नेहाच्या साखरपुड्यातील परीचं गोड गाणं, नक्की ऐका

VIDEO: यश नेहाच्या साखरपुड्यातील परीचं गोड गाणं, नक्की ऐका

'माझी तुझी रेशीमगाठ' ( Majhi Tujhi Reshimgath) मालिकेत परी (pari) मालिकेत नेहमीच धम्माल करत असते. यश आणि नेहा यांच्या साखरपुड्यात परीने गायलेलं गाणं सध्या व्हायरल होत आहे

  मुंबई, 27 मे:  'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath )  ही मालिका फार कमी वेळेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. मालिकेतील छोट्या परीने तिच्या लाघवी आणि क्यूट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक प्रेक्षक केवळ परीचा अभिनय पाहायला मिळावा यासाठी मालिका आवर्जुन पाहतात. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आता लवकरचं नेहा आणि यश यांचा साखरपुडा होणार आहे. मालिकेतील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल होत आहेत. नेहा आणि यश यांच्यासोबत परीचा क्यूट लुक देखील समोर आला आहे. लाल फ्रॉक घातलेली परी फारच सुंदर दिसत आहे. परी मालिकेत नेहमीच धम्माल करत असते. यावेळीही तिने तूफान धम्माल केली आहे त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. यश आणि नेहा यांच्या साखरपुड्यात परीने गायलेलं गाणं सध्या व्हायरल होत आहे. मज्जा डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत छोट्या परीने म्हणजेच मायरा वायकुळने (Mayra Vaikul) मालिकेचं टायटल साँग गायलं आहे. छोट्या परीच्या बोबड्या बोलात मालिकेचं गाणं ऐकायला फार सुंदर वाटत आहे. परीचं हे गाणं सध्या व्हायरल होत असून गाणं ऐकून परीचं कौतुकही होत आहे. अनेकांनी कमेंट करत  'फार गोडं', 'खुप सुंदर', 'परी तुला खूप खूप आशिर्वाद', असं म्हणतं परीचं कौतुक केलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Majja (@its.majja)

  मालिकेच्या येत्या भागात यश आणि नेहाचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - VIDEO: लवकरच पार पडणार नेहा-यशचा साखरपुडा, चिमुकली परी करणार खास आवाहन
   सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नेहाचा पारंपरिक लूक समोर आला आहे.  नेहाने हिरवी साडी नेसली आहे. तर यशने तिला मॅचिंग कुर्ता घातला आहे. इतकंच नाही तर नेहाने घातलेल्या ऑक्सिडाइज दागिन्यांनीही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. परीने देखील सर्वांना तिच्या आई आणि फ्रेंडच्या लग्नाला यायाच आग्रहाचं गोड आमंत्रण दिलं आहे.
  माझी तुझी रेशीगाठ मालिकेच्या मागील भागात नेहाच परीची आई असल्याचं सत्य यश आजोबांना सांगतो. हे सत्य ऐकून आजोबांना धक्का बसतो.  तर नेहा देखील खाली कोसळते. मालिकेत पुढे काय झालं? यश आणि नेहाच्या साखरपुड्याला आजोबांनी होकार कसा दिला? मधल्या काळात यश नेहाच्या आयुष्यात नक्की काय झालं? ते साखरपुड्यापर्यंत कसे येऊन पोहोचले? हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या