National school of drama ची धुरा आता परेश रावल यांच्या हाती; संचालकपदी नियुक्ती

National school of drama ची धुरा आता परेश रावल यांच्या हाती; संचालकपदी नियुक्ती

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (National school of drama) चे नवे संचालक म्हणून अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी द‍िल्‍ली : प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल (Paresh rawal) यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (National school of drama) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार परेश रावल आता एनएसडीची (NSD) धुरा सांभळतील. राजस्थानचे प्रसिद्ध कवी अर्जुन देव चरण यांची जागा ते घेणार आहेत.

2018 साली त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक म्हणून अर्जुन देव चरण यांना नियुक्त करण्यात आलं होतं. आता परेश रावल हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे नवे संचालक आहेत. NSD च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनीदेखील याबाबत ट्वीट करत परेश रावल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रल्हाद पटेल म्हणाले, "प्रसिद्ध कलाकार परेश रावल यांना राष्ट्रपतींद्वारा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं संचालकपद देण्यात आलं आहे. त्यांच्या प्रतिभेचा फायदा देशभरातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना मिळेल. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा"

Published by: Priya Lad
First published: September 10, 2020, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading