पुलवामा हल्ल्यावर आलं परेश रावल यांचं मोठं विधान, ‘त्यांना त्यांचं मरण मरू द्या आणि...’

पाकिस्तानकडून आयात मालावर २०० टक्के कर लावण्यात आला आहे. यावरून आर्थिक, सांस्कृतिक आणि जागतिक पातळीवर पाकिस्तानला कोंडीत भारताने पकडलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 05:54 PM IST

पुलवामा हल्ल्यावर आलं परेश रावल यांचं मोठं विधान, ‘त्यांना त्यांचं मरण मरू द्या आणि...’

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देश विरोध करत आहे. तसेच सरकारला लवकरात लवकर पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंतीही केली जात आहे. बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानकडून आयात मालावर २०० टक्के कर लावण्यात आला आहे. यावरून आर्थिक, सांस्कृतिक आणि जागतिक पातळीवर पाकिस्तानला कोंडीत भारताने पकडलं आहे. या दरम्यान, अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनीही या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत नोंदवलं आहे. त्यांनी सर्व भारतीय वृत्तवाहिनीना एक विनंती केली आहे. परेश यांनी वाहिन्यांना आवाहन करणारे ट्विट करत म्हटले आहे की, यापुढे वाहिन्यांवरील शोवर कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला बोलवू नये तसेच त्यांच्याशी कोणतं संभाषणही करू नये.रावल म्हणाले की, ‘आपल्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना मी आवाहन करतो की कृपया कोणत्याही पाकिस्तानी किंवा दहशतवाद्यांबद्दल पुळका असणाऱ्या व्यक्तीला वाहिन्यांवरील कार्यक्रमात बोलावू नका.’ ते पुढे म्हणाले की, ‘त्या पिसाळलेल्या कुत्र्यांना आमच्या घरात काही स्थान नाही. त्यांना त्यांचं मरण मरू दे.’ या ट्विटआधीही आपला राग व्यक्त करणारं अजून एक ट्विट रावल यांनी केलं होतं. या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘पुलवामा हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. बाहेरच्या आणि आतील शत्रूंनादेखील नेस्तनाबूत केलं पाहिजे. भारतीय जवानांसाठी आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत.’


Loading...


दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड गायक कैलाश खेर शनिवारी देवरिया महोत्सवात सहभागी होणार होता. मात्र, पिलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने आपला शो रद्द केला आणि हल्ल्यात शहीद झालेला जवान विजय कुमार यांच्या कुटुंबाला भेटायला गेला. विजय हे उत्तर प्रदेश मधील देवरिया जिल्ह्यातील छपिया गावचा राहणारे होते. कैलाश खेरने रविवारी दुपारी विजय यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि आर्थिक मदत केली. कैलाश खेरने शहीद विजय यांच्या पत्नी विजयलक्ष्मी आणि वडील रामायण मौर्या यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा चेक दिला. कुटुंबाला धीराचे शब्द देत विजयलक्ष्मी यांना कठीण काळात हिंमत्तीने प्रसंगाला सामोरं जाण्याचा सल्ला दिला. कैलाशने जवळपास २० मिनिटं कुटुंबीयांसोबत वेळ घालवला.

तसेच जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ४० भारतीय सीआरपीएफच्या जवानांना वीरमरण आलं. या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वसामान्य नागरिकापासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्वांमध्येच पाकिस्तानविरुद्ध चीड निर्माण झाली आहे. या सगळ्यात अजय देवगणने एक मोठा निर्णय घेतला. अजयने ट्विट करत त्याचा आगामी 'टोटल धमाल' हा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय त्याने घेतला असल्याचे स्पष्ट केले. अजयने ट्विटमध्ये लिहिले की, ‘पुलवामा हल्ल्यानंतर सध्याचं वातावरण पाहता टोटल धमालच्या टीमने हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.’

Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...