• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'परदेस' फेम अभिनेत्रीचा झालेला भयंकर अपघात, चेहऱ्यात घुसले होते काचेचे हजारो तुकडे, मृत्यूच्या दाढेतून आली परत

'परदेस' फेम अभिनेत्रीचा झालेला भयंकर अपघात, चेहऱ्यात घुसले होते काचेचे हजारो तुकडे, मृत्यूच्या दाढेतून आली परत

जेष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या हिंदी चित्रपटातून माहिमा चौधरी अल्पवधीतच स्टार झाली. परंतु, या चित्रपटानंतर तिला फारसं यश मिळालं नाही.

  • Share this:
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : बॉलिवूडमध्ये (Bollywood) नाव कमवणं, यशस्वी होणं हा तसा नशीबाचा भागही ठरतो. काही अभिनेते (Actor) आणि अभिनेत्री (Actress) एका रात्रीत स्टार होतात, तर काही जण अनेक चित्रपट करूनही यशस्वी होऊ शकत नाहीत. अनेक अभिनेते, अभिनेत्रींच्या खासगी जीवनात अशा काही घटना घडतात, की ते आपोआपच चित्रपटसृष्टीपासून दुरावले जातात. अभिनेत्री माहिमा चौधरी (Actress Mahima Chaudhary) हे त्यापैकीच एक नाव. जेष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या हिंदी चित्रपटातून माहिमा चौधरी अल्पवधीतच स्टार झाली. परंतु, या चित्रपटानंतर तिला फारसं यश मिळालं नाही. त्यातच तिच्या खासगी जीवनात एक दुर्घटना घडली या दुर्घटनेनंतर तिनं फारसे चित्रपट केले नाहीत. नुकतंच तिनं वयाच्या 48 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अभिनेत्री माहिमा चौधरीचा जन्म 13 सप्टेंबर 1973 ला पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला. तिने नुकतंच वयाच्या 48 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तिचं खासगी आयुष्य आणि चित्रपटसृष्टीतील कारकिर्द काहीशी वादळी ठरली. परदेस या चित्रपटातून माहिमाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे ती एका रात्रीत स्टार झाली. माहिमा चौधरीचं खरं नाव रितू चौधरी. परंतु, तिचं माहिमा असं स्क्रिनवरील नामकरण सुभाष घई (Subhash Ghai) यांनी केलं. परंतु, यानंतर तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकले नाहीत. परदेसनंतर माहिमाने ‘दिल क्या करें’, ‘धडकन’, ‘कुरूक्षेत्र’, ‘दाग’, ‘खिलाडी 420’, ‘सॅंडविच’, ‘दीवाने’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘लज्जा’ आणि ‘बागबान’ सारखे चित्रपट केले. परंतु, अपवाद वगळता हे चित्रपट फारसे प्रभावी ठरले नाहीत. चित्रपट क्षेत्रात काम सुरू असताना तिच्या वैयक्तिक जीवनात एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे माहिमाला मोठा धक्का बसला आणि त्यानंतर ती बराच काळ सिनेसृष्टीपासून दूर राहिली. 2016 मध्ये `डार्क चॉकलेट` या चित्रपटात ती अखेरची दिसली. सध्या ती तिची 14 वर्षांची मुलगी अरियाना हिच्या संगोपनात व्यस्त असून, चित्रपटसृष्टीतून पूर्णपणे ब्रेक घेतला आहे.

'पॉकेट ब्रा आणि स्कर्ट' LOOK मुळे राधिका मदान पुन्हा आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

22 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999 मध्ये माहिमा चौधरी `दिल क्या करे` या चित्रपटाचं शुटिंग (Shooting) करत होती. चित्रपटाच्या शुटिंगला जात असताना, एका दूधाच्या टॅंकरने तिच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) माहिमा गंभीर जखमी झाली. अपघातादरम्यान काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यात घुसले आणि तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. त्यावेळी मला मरणयातना होत होत्या. माझ्या मदतीसाठी कोणीही आलं नाही. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही वेळाने माझी आई आली. त्यानंतर अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) रुग्णालयात आला आणि त्यानं अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर शस्त्रक्रिया करून माझ्या चेहऱ्यावरील काचेचे तुकडे काढण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर बराच काळ मी घरीच होते. चेहऱ्याची उन्हापासून काळजी घ्यावी, तसंच आरश्यात माझा चेहरा दाखवू नये, असं सांगण्यात आलं होतं. या घटनेनंतर मला चित्रपटात कोणी घेणार नाही, असं मला वाटत होतं. या घटनेनंतर मला बराच काळ ब्रेक घ्यावा लागल्याचं माहिमा चौधरीनं सांगितलं. बऱ्याच कालावधीनंतर मी चित्रपटसृष्टीत परतले आणि काही सिनेमे केले. परंतु, त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही, असंही माहिमा सांगते

Video: रणवीर सिंंगचा Game Show देणार नशीब बदलण्याची संधी, प्रोमो आला समोर

2006 मध्ये माहिमा चौधरीने बॉबी मुखर्जी यांच्यासोबत विवाह केला. त्यापूर्वी काही वर्षे माहिमा टेनिसपटू लिएडंर पेसला डेट करत होती. 6 वर्ष हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते, तसंच काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिले. या काळात माहिमाने करिअरकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. पण हे नातं संपुष्टात आलं. बॉबी मुखर्जी यांच्या सोबतचं वैवाहिक जीवनही काही कारणांमुळे फार काळ टिकलं नाही. बॉबी आणि माहिमा यांचे छोटया छोट्या गोष्टींवरून वाद होत होते. त्याच दरम्यान माहिमाचा दोन वेळा गर्भपातही झाला. या काळात तिच्या पतीने तिला साथ दिली नाही. त्यामुळे सध्या माहिमा चौधरी तिच्या मुलीचं संगोपन एकटी करत आहे. अपघात आणि खासगी आयुष्यातील काही घटनांमुळे माहिमा चौधरी चित्रपटसृष्टीपासून दुरावली.
First published: