Home /News /entertainment /

“मी हरामखोर नाही देशभक्त आहे”; कंगनानं केला सरकारला एक्सपोज करण्याचा दावा

“मी हरामखोर नाही देशभक्त आहे”; कंगनानं केला सरकारला एक्सपोज करण्याचा दावा

या पत्रावरुन अभिनेत्री कंगना रणौत हिनं पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. “मी म्हणाले होते हे सरकार भ्रष्टाचारी आहे अन् मी देशभक्त” असा टोला तिनं लगावला आहे.

    मुंबई 21 मार्च: राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या एका पत्रामुळं  गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे अडचणीत सापडले आहेत. “दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी सीआययूचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना दिले होते. त्यातले 40 ते 50 कोटी रुपये मुंबईतल्या 1750 बार आणि रेस्टॉरंट्समधून गोळा होऊ शकतात, असं देखील गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना सांगितलं होतं”, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे. दरम्यान या पत्रावरुन अभिनेत्री कंगना रणौत हिनं पुन्हा एकदा महाराष्ट्र  सरकारवर निशाणा साधला आहे. “मी म्हणाले होते हे सरकार भ्रष्टाचारी आहे अन् मी देशभक्त” असा टोला तिनं लगावला आहे. “येत्या काळात हे भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे एक्सपोज होईल. मी केलेला दावा अखेर सिद्ध झाला आहे. माझ्या शरीरात राजपुतांचं रक्त आहे. मी आणि माझं कुटुंब या भूमीवर प्रचंड प्रेम करतो. मी हरामखोर नाही खरी देशभक्त आहे.” अवश्य पाहा - ‘लहान कपड्यांमुळं स्टेजवरुन धक्का मारुन खाली उतरवलं’; गायिकेनं सांगितला अनुभव  अवश्य पाहा - VIDEO: ‘असं पाहू नका नजर लागेल...’; राखी सावंतच्या घरात पैशांचा पाऊस “जेव्हा मी महाराष्ट्र सरकारविरोधात आवाज उठवला तेव्हा मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. माझ्यावर टीका झाली. पण जेव्हा मी माझ्या शहरासाठी आवाज उठवला तेव्हा त्यांनी माझं घर तोडलं. तेव्हा अनेक लोकांनी आनंद साजरा केला होता. पण आता त्यांच्या खेळ दिर्घकाळ चालणार नाही.” अशा आशायाची दोन् ट्विट्स करुन कंगनानं राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली आहे. तिची ही ट्विट्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. परमबीर सिंग यांनी पत्रामध्ये केलेल्या दाव्यानुसार, “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी एसीपी पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना बोलावून मुंबईत असलेल्या 1750 बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून 40 ते 50 कोटी रुपये गोळा करण्याचे निर्देश दिले होते. पाटील यांनी त्याच दिवशी मला याबाबत माहिती दिली. गृहमंत्र्यांसोबत झालेली ही मीटिंग 4 मार्च रोजी झाल्याचं देखील त्यांनी मला सांगितलं”, असं परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलं आहे. याच्या पुराव्यादाखल 16 मार्च आणि 19 मार्च रोजी एसीपी पाटील यांच्यासोबत मेसेजवर झालेलं संभाषण त्यांनी पत्रासोबत दिलं आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    पुढील बातम्या