मुंबई, 12 सप्टेंबर : गझल सम्राट पंकज उधास न्यूज18लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये आले होते. गझल सम्राटांनी सगळ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. पंकज उधास आणि बाॅलिवूडचं नातं अनेक वर्षांचं. अनेक कलाकार, गायक, गायिका यांच्या बरोबर त्यांची चांगली मैत्री. गप्पा मारता मारता त्यांनी शाहरूख खानचा एक किस्सा आमच्याशी शेअर केला.
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की किंग खाननं सुपरस्टार होण्याआधी खूपच संघर्ष केलाय. फिल्म इंडस्ट्रीत कुणीही गाॅडफादर नसल्यानं शाहरुखनं छोटी-मोठी कामं करणं सुरू केलं होतं. अशातच पंकज उधास यांची एक मैफल होती. त्यासाठी शाहरुखनं सहाय्यकाचं काम केलं. त्याचं ते पहिलंच काम होतं. त्या कामातून त्याला बरीच कमाई मिळाली. या कमाईचं त्यानं काय केलं ठाऊकेय? तो आग्रा फिरायला गेला.
गझलगायक पंकज उधास यांचं पहिलंच गणपतीवरचं नवीन गाणं रिलीज झालंय. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरावर हे गाणं आधारित असून ‘जय गणेश’ हे भक्तिगीत सीडी स्वरूपात देण्यात आलं आहे. सीडीतील हे भक्तीगीत पंकज उधास यांनी श्री सिद्धीविनायक गणपतीला अर्पण केले आणि या सीडीचे प्रकाशन झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
'गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवसच बाकी असताना मुंबई, महाराष्ट्रबरोबरच संपूर्ण देश आणि जगातच चैतन्याची एक लहर पसरली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये हे चैतन्य टिपेला पोचणार आहे. मी गेली कित्येक वर्ष सिद्धीविनायकाची भक्ती करतो आहे. मला सिद्धीविनायकाच्या चरणी एक गाणं अर्पण करायचं होतं आणि गेली कित्येक वर्षे ते मनात घोळत होतं. आता या गाण्याच्या रूपाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे, असे उद्गार पंकज उधास यांनी काढले.
पंकज उधास यांनी अशा अनेक आठवणी प्रेक्षकांशी शेअर केल्यात. अनेक माहीत नसलेले किस्से त्यांनी सांगितले. ते तुम्ही पाहू शकता खालील व्हिडिओत-
...म्हणून सलमाननं दिला 'धूम 4'ला नकार
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा