सलमान खाननं पंकज उधासना 'अशी' दिली दाद

सलमान खाननं पंकज उधासना 'अशी' दिली दाद

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : गझल सम्राट पंकज उधास न्यूज18लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये आले होते. गझल सम्राटांनी सगळ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. पंकज उधास आणि बाॅलिवूडचं नातं अनेक वर्षांचं. अनेक कलाकार, गायक, गायिका यांच्या बरोबर त्यांची चांगली मैत्री. गप्पा मारता मारता त्यांनी सलमान खानचा एक किस्सा आमच्याशी शेअर केला.

सलमानच्या 'साजन' सिनेमात पंकज उधास यांचं गाणं खूपच हिट झालंय. जिये तो जिये कैसे बिन आपके या गाण्याचं शूटिंग सुरू होतं. गाणं संपतं आणि एक प्रकारची शांतता निर्माण होते. तेव्हा सलमाननं उत्स्फूर्तपणे म्हटलं, वा पंकजभाई वा! नंतर सिनेमात हे एडिट केलं नाही. तसंच ठेवून दिलं.

गझलगायक पंकज उधास यांचं पहिलंच गणपतीवरचं नवीन गाणं रिलीज झालंय. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरावर हे गाणं आधारित असून ‘जय गणेश’ हे भक्तिगीत सीडी स्वरूपात देण्यात आलं आहे. सीडीतील हे भक्तीगीत  पंकज उधास यांनी श्री सिद्धीविनायक गणपतीला अर्पण केले आणि या सीडीचे प्रकाशन झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

सलमान खान आणि अमिताभ बच्चन लवकरच आमने सामने

करण जोहरनं रणवीर-दीपिकाच्या लग्नाबद्दल नक्की काय सांगितलं?

'मणिकर्णिका'साठी कंगना राणावत घेतेय खास ट्रेनिंग, सिनेमात आहे सरप्राईझ

'गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवसच बाकी असताना मुंबई, महाराष्ट्रबरोबरच संपूर्ण देश आणि जगातच चैतन्याची एक लहर पसरली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये हे चैतन्य टिपेला पोचणार आहे. मी गेली कित्येक वर्ष सिद्धीविनायकाची भक्ती करतो आहे. मला सिद्धीविनायकाच्या चरणी एक गाणं अर्पण करायचं होतं आणि गेली कित्येक वर्षे ते मनात घोळत होतं.  आता या गाण्याच्या रूपाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे, असे उद्गार पंकज उधास यांनी काढले.

पंकज उधास यांनी अशा अनेक आठवणी प्रेक्षकांशी शेअर केल्यात. अनेक माहीत नसलेले किस्से त्यांनी सांगितले. ते तुम्ही पाहू शकता खालील व्हिडिओत-

First published: September 13, 2018, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading