VIDEO : पंकज उधास म्हणतायत, गणपती बाप्पा मोरया!

गझलगायक पंकज उधास यांचं पहिलंच गणपतीवरचं नवीन गाणं रिलीज झालंय. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरावर हे गाणं आधारित असून ‘जय गणेश’ हे भक्तीगीत सीडी स्वरूपात देण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2018 11:49 AM IST

VIDEO : पंकज उधास म्हणतायत, गणपती बाप्पा मोरया!

मुंबई, 11 सप्टेंबर : गझलगायक पंकज उधास यांचं पहिलंच गणपतीवरचं नवीन गाणं रिलीज झालंय. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरावर हे गाणं आधारित असून ‘जय गणेश’ हे भक्तीगीत सीडी स्वरूपात देण्यात आलं आहे. सीडीतील हे भक्तीगीत  पंकज उधास यांनी श्री सिद्धीविनायक गणपतीला अर्पण केले आणि या सीडीचे प्रकाशन झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

'गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवसच बाकी असताना मुंबई, महाराष्ट्रबरोबरच संपूर्ण देश आणि जगातच चैतन्याची एक लहर पसरली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये हे चैतन्य टिपेला पोचणार आहे. मी गेली कित्येक वर्ष सिद्धीविनायकाची भक्ती करतो आहे. मला सिद्धीविनायकाच्या चरणी एक गाणं अर्पण करायचं होतं आणि गेली कित्येक वर्षे ते मनात घोळत होतं.  आता या गाण्याच्या रूपाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे, असे उद्गार पंकज उधास यांनी काढले.

'गेल्याच आठवड्यात कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने आम्ही जुहू येथील इस्कॉन मंदिरात ‘कृष्ण चांट्स’ या अल्बमचे विमोचन केलं. माझं भाग्य असं की आता सिद्धिविनायकाच्या चरणी माझी भक्तीरुपी सेवा अर्पण करण्याची संधी मला या सीडीच्या माध्यमातून मिळत आहे,' असंही उधास यांनी पुढे म्हटलं. या गीतासाठी विशाल धुमाळ यांनी संगीत दिग्दर्शन केले असून संगीत रचना अवि लोहार यांची आहे.

पंकज उधास यांच्याकडे गझल हा प्रकार लोकप्रिय करण्याचं श्रेय जातं. लोकांवरील गझलांचा प्रभाव कमी होत असतानाच्या काळात त्यांनी हे महत्त्वपूर्ण काम केलं. आज सर्वत्र गतिमान आणि पॉप संगीताची चलती असताना त्यांनी एक गोष्ट सिद्ध केली आहे की, गझल संपूर्ण जगातील संगीतरसिकांना मोहिनी घालते.

Loading...

शिवाय संगीत हे कोणत्याही मशीनमधून येत नसतं तर ते कलाकाराच्या आत्म्यातून येणं गरजेचं असतं, हेसुद्धा त्यांनी सिद्ध केलं आहे. ‘चिठ्ठी आई है’ या ‘नाम’ चित्रपटातील गाण्याने १९८६ साली त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. एका रात्रीत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता मिळाली. या हिट गाण्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आणि ती अनंत काळापर्यंत रसिकांच्या मनावर गारुड करून राहतील.

PHOTOS : गणरायाच्या परीक्षेत विठुमाऊली होणार का पास?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 11:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...