मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शाहीन बागच्या आजीचा दणका; 'त्या' ट्वीटमुळं कंगनाच्या अडचणींत वाढ

शाहीन बागच्या आजीचा दणका; 'त्या' ट्वीटमुळं कंगनाच्या अडचणींत वाढ

कंगना रणौतने (Kangana ranaut) ट्विटरवर महिंदर कौर (mahinder kaur) यांना 'शाहीन बागची आजी' (Shaheen bagh grandma) संबोधलं  होतं. तसेच त्यांच्या विरोधात अपमानजनक टिप्पणी केली होती.

कंगना रणौतने (Kangana ranaut) ट्विटरवर महिंदर कौर (mahinder kaur) यांना 'शाहीन बागची आजी' (Shaheen bagh grandma) संबोधलं होतं. तसेच त्यांच्या विरोधात अपमानजनक टिप्पणी केली होती.

कंगना रणौतने (Kangana ranaut) ट्विटरवर महिंदर कौर (mahinder kaur) यांना 'शाहीन बागची आजी' (Shaheen bagh grandma) संबोधलं होतं. तसेच त्यांच्या विरोधात अपमानजनक टिप्पणी केली होती.

बठिंडा, 09 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) कंगना रणौतच्या (Kangana ranaut) अडचणी थांबायचं नाव घेईनात. कंगना रणौतला एकामागून एक अशा अनेक अडचणींना सध्या तोड द्यावं लागत आहे. आता त्यांच्या अडचणींत आणखी एक भर पडली आहे. कारण पंजाबच्या महिला शेतकरी महिंदर कौर (Women farmer Mahinder Kaur) यांनी बठिंडाच्या न्यायालयात कंगना रणौत विरोधात तक्रार दाखल केली आहे.

कंगना रणौतने ट्विटरवर महिंदर कौर यांना 'शाहीन बागची आजी' संबोधलं  होतं. तसेच त्यांच्या विरोधात अपमानजनक टिप्पणी केली होती. कौर यांचे वकील रघुबीर सिंह यांनी शुक्रवारी सांगितलं की, भारतीय दंड संहितेच्या कलम 499 (मानहानी) आणि कलम 500 (मानहानीची शिक्षा) अंतर्गत तक्रार दाखल केली गेली आहे. या तक्रारीची सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती कौर यांच्या वकिलांनी दिली. पंजाबमधील  73 वर्षीय महिलेनं  आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, कंगनाने आपली तुलना एका वेगळ्या महिलेशी करून ट्विटमध्ये 'खोटे आरोप आणि टिप्पण्या' केल्या आहेत. कंगनाच्या मते ही वृद्ध महिला तिच महिला आहे, जी शाहीन बाग अंदोलनात सहभागी झाली होती.

कौर यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला की, 'अशाप्रकारची प्रतिक्रिया देऊन अभिनेत्रीनं माझी प्रतिष्ठा कमी केली आहे. चूकीच्या आणि अपमानजनक ट्विटमुळे आपल्याला मानसिक ताण, वेदना, छळ, अपमान आदी गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. बहादूरगड जांदिया गावात राहणारी कौर म्हणाल्या की, राणौत यांनी अद्याप बिनशर्त माफीही मागितलेली नाही.

हे ही वाचा-मॅरेज ब्युरोच्या नावाखाली सुरू होता अल्पवयीन मुलींना विकण्याचा धंदा

कंगनाने शाहीन बागच्या आजी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बिलकिस बानो आणि महिंदर कौर यांचे फोटो एकत्र शेअर केले होते. कालांतराने कंगनाला तिची चूक लक्षात आल्यानंतर तिनं हे संबंधित ट्विट हटवलं होतं. शुक्रवारी कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चांडेल, या दोघींचा वांद्रे पोलीस ठाण्यात देशद्रोह आणि जातीय द्वेष पसरवल्याच्या गुन्ह्यात जाब नोंदवून घेतला आहे. यापूर्वी कंगनाने एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिनं मत व्यक्त केल्यामुळे आपल्याला लक्ष्य केलं जात, असल्याचा दावा केला होता.

First published:

Tags: Bollywood actress, Kangana ranaut