राज ठाकरे यांनी पाहिला 'पानिपत'चा ट्रेलर; म्हणाले, हा सिनेमा...

राज ठाकरे यांनी पाहिला 'पानिपत'चा ट्रेलर; म्हणाले, हा सिनेमा...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सिनेमाचा ट्रेलर पाहिला असून त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका असे एकामागोमाग एक ऐतिहासिक सिनेमा रिलीज झाले त्यानंतर आता आणखी एक ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तो म्हणजे ‘पानिपत’. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अर्जुन कपूर, कृती सेनन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात मराठा साम्राज्याच्या इतिहासाची पानं उलगडली जाणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सिनेमाचा ट्रेलर पाहिला असून त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. त्यांनी लिहिलं, ‘मी नुकताच मराठा साम्राज्याच्या इतिहासावर आधारित ‘पानिपत’ सिनेमाचा ट्रेलर पाहिला. प्रेक्षकांशी जोडून राहण्यात हा सिनेमा नक्की यशस्वी ठरेल. आशुतोष गोवारिकरांच्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचेल. ट्रेलर आणि सिनेमा नक्की पाहा.’

मध्यरात्री कारमध्ये रोमान्स करत होती अभिनेत्री, पोलिसांनी रंगेहात पकडलं आणि...

या सिनेमात अर्जुन कपूर सदाशिवराव पेशव्यांची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री कृती सेनन त्यांची पत्नी पार्वती बाईची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची कथा पनिपतच्या युद्धाची कथा साकारण्यात आली असून अर्जुननं सदाशिवराव पेशव्यांच्या भूमिकेत फिट बसल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. तर कृती सेनननं मराठमोळ्या वेशात सर्वांची मनं जिंकली आहेत. अभिनेता संजय दत्तनं मात्र अहमद शाह अब्दालीच्या खलनायकी भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तो या सिनेमातून पुन्हा एकदा खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पानीपतची लढाई 1761 मध्ये मराठा साम्राज्य आणि दुराणी साम्राज्यात झाली होती. या सिनेमात पानीपतच्या युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे. ही लढाई मराठा साम्राज्याचे सदाशिवराव भाऊ आणि अफगानिस्तानचा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. ही लढाई 14 जानेवारी 1761 सध्याच्या हरियाणामधील पानीपत मैदानात झाली. हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला रिलीज होत आहे.

करिनासोबच्या नात्यावर सैफ अली खानने केला खुलासा, अशी आहे दोघांची केमेस्ट्री

दरम्यान अर्जुन कपूरच्या बाबतीत मात्र प्रेक्षकांचा नाराजीचा सूर दिसून येत आहे. अर्जुनच्या बाबतीत दिग्दर्शकाची निवड चुकल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पानिपतच्या ट्रेलरवर आलेल्या सोशल मीडियावरील रिअ‍ॅक्शनमध्ये एकंदर अर्जुन बद्दल सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी या सिनेमाला ‘बाजीराव मस्तानी’ची कॉपी म्हटलं आहे. तर काहींनी या सिनेमाला सर्वात मोठा पीरियड सिनेमा म्हटलं आहे. यातील संजय दत्तची भूमिका व्हिलनचा बाप असल्याचं बोललं जात आहे. तसेच कृती सेननच्या भूमिकेचंही कौतुक झालं मात्र अर्जु कपूर मात्र कोणालाच आवडलेला नाही. त्याच्या ऐवजी प्रेक्षकांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले आहेत.

मैत्रिणीच्या लग्नात डान्स करून बिघडली दीपिकाची तब्येत, पाहा कशी झाली अवस्था

======================================================================

नदीशेजारी उलटला रसायनानं भरलेला टँकर; पाण्यावर पांढऱ्या फेसाची चादर, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या