मुंबई, 27 जुलै : अभिनेता अर्जुन कपूर त्याचा आगामी सिनेमा पानिपतसाठी खूप जास्त मेहनत घेत आहे. यासाठी त्यानं या सिनेमासाठी अनेकदा मुंडनही केलं होतं. ज्यामुळे मागच्या काही महिन्यापासून अर्जुनला टोपी घालावी लागत होती. मात्र आता अर्जुननं अखेर ही टोपी काढून टाकली आहे. यासोबतचं त्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओसुद्धा शेअर केला. ज्यामध्ये त्यानं मागच्या 9 महिन्यांपासून तो टोपी घालून का फिरत असे याबाबतचा खुलासा केला आहे.
अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. ज्या व्हिडिओला त्यानं, ‘9 महिन्यांनंतर बाल बाल बच गए’ असं कॅप्शन दिलं. त्याच्या फोटोवर कमेंट करण्यापासून गर्लफ्रेंड मलायका सुद्धा स्वतःला रोखू शकली नाही. तिनं अर्जुनच्या या पोस्टवर, ‘फायनली’ अशी कमेंट केली आहे.
'स्वराज्यरक्षक संभाजी'मध्ये होणार नव्या पाहुण्याचं आगमन
या आधीही अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ज्याला त्यानं, 'मी माझी कॅप काढण्यासाठी तयार आहे. मला माहित आहे की लोक मागच्या काही महिन्यापासून मला कॅप घातलेलं पाहत आहेत आणि मी असं का करतोय असं विचार करत असतील.' असं कॅप्शन दिलं.
Bachchan Pandey चं पोस्टर लाँच, हटके लूकमुळे अक्षय कुमार पुन्हा चर्चेत
अर्जुननं पुढे लिहिलं, 16 नोव्हेंबर 2018 ला मी पहिल्यांदा पानीपत या सिनेमासाठी मुंडन केलं होतं. आता जुलै संपत आला सिनेमाचं शूट सुद्धा पूर्ण झालं. अखेर मी आता ही कॅप काढू शकतो. पण दुर्दैवानं मला आता या सर्व कॅप सोडव्या लागणार आहेत. ज्या मागच्या 7-8 महिन्यापासून मी कलेक्ट केल्या आहेत. पण हा अनुभव खूप चांगला होता.
धोनीच्या या बेस्ट फ्रेंडला जायचंय पाकिस्तानात, इम्रान खान यांना म्हणाली...
‘पानिपत’मध्ये अर्जुन सर्वात कठीण भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अर्जुन एका योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानं यात फक्त लुकवरच नाही तर त्याच्या बॉडीवरही खूप मेहनत घेतली आहे. याबाबत त्यानं काही दिवसांपूर्वीचं एका मुलाखतीमध्ये सविस्तर माहिती दिली होती.
=========================================================
VIDEO : भररस्त्यावर कारने घेतला पेट, अखेर जवानांनी विझवली आग
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा