‘पानीपत’च्या अडचणी वाढल्या, पेशव्यांसहित 48 सरदारांचे वारसदार पोहोचले कोर्टात

‘पानीपत’च्या अडचणी वाढल्या, पेशव्यांसहित 48 सरदारांचे वारसदार पोहोचले कोर्टात

पानीपत सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून पेशव्यांसह 48 सरदारांचे वारसदार या सिनेमाच्या विरोधात कोर्टात गेले आहे. वाचा नक्की काय आहे कारण...

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : अभिनेता अर्जुन कपूर याची मुख्य भूमिका असलेला सिनेमा ‘पानीपत’ मागच्या काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सुरुवातीला अभिनेता अर्जुन कपूरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होत. पण आता मात्र हा सिनेमा पुरता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पेशव्यांसह 48 सरदारांचे वारसदार या सिनेमाच्या विरोधात कोर्टात गेले असून त्यांनी पुणे जिल्हा दिवाणी न्यायालयात निर्मात्यांविरोधात याचिका दाखल केली आहे.

पानीपत सिनेमामध्ये पेशवेकालीन इतिहास दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा पानीपतच्या 3 युद्धावर आधारित आहे. या सिनेमा सदाशिवराव पेशव्यांची भूमिका अभिनेता अर्जुन कपूरनं साकारली आहे. हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. मात्र प्रदर्शनाआधीच या सिनेमासमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे, इब्राहीमखान गारदी यांच्यासह 48 सरदार वारसदारांनी या सिनेमाला विरोध करत पुणे जिल्हा दिवाणी न्यायालयात निर्मात्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

लग्नाच्या वाढदिवसाआधीच प्रियांकाचं निकला स्पेशल गिफ्ट, घरी आला छोटा पाहुणा

या सिनेमामध्ये सदाशिवराव पेशवे यांचा इतिहास दाखवण्यात आला आहे. मात्र जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे, इब्राहीमखान गारदी यांच्यासह 48 सरदारांचा इतिहास या सिनेमात दाखवलेला नाही. त्यामुळे आता त्यांच्या वारसदारांनी यावर आक्षेप घेत सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर कोर्टात पोहोचलं आहे. सिनेमाच्या निर्मात्यांच्या विरोधात पुणे जिल्हा दिवाणी न्यायालयात यचिका दाखल केली आहे. तसेच उच्च न्यायालयात ही रिट फाईल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आधी फक्त शर्ट घालून बाहेर पडली, आता मेकअपमुळे फसली मलायका अरोरा

पानीपतची लढाई 1761 मध्ये मराठा साम्राज्य आणि दुराणी साम्राज्यात झाली होती. या सिनेमात पानीपतच्या युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे. ही लढाई मराठा साम्राज्याचे सदाशिवराव भाऊ आणि अफगानिस्तानचा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. ही लढाई 14 जानेवारी 1761 सध्याच्या हरियाणामधील पानीपत मैदानात झाली. या सिनेमात अनेक लांब अ‍ॅक्शन सीन शूट करण्यात आले आहेत. या सिनेमात अर्जुन कपूर व्यतिरिक्त कृती सेनन आणि संजय दत्त यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अर्जुन-कृतीनं या सिनेमासाठी या युद्ध कलांचं प्रशिक्षण घेतलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केलं असून हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला रिलीज होत आहे.

सलमान खानचा ‘दबंग 3’ अडकला वादात, हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप

 ==============================================================================

First published: November 27, 2019, 3:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading