कसा आहे कंगनाचा ‘पंगा’, सिनेमाचा बघायला जाण्याआधी वाचा Public Review

कसा आहे कंगनाचा ‘पंगा’, सिनेमाचा बघायला जाण्याआधी वाचा Public Review

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा पंगा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर रिव्ह्यू दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा पंगा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सिनेमाच्या रिलीजपूर्वी कंगनानं त्याचं जोरदार प्रमोशन केलं होतं. हा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर रिव्ह्यू दिले आहेत. हे पाहिल्यावर समजतं की कंगना पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली असल्याचं दिसून येतं. ट्विटरवर सर्वच कंगनाचं कौतुक करताना दिसत आहेत.

मागच्या वर्षी रिलीज झालेल्या कंगनाच्या जजमेंटल है क्या या सिनेमाला तितकेसे चांगले रिव्ह्यू मिळाले नव्हते अशात ‘पंगा’ला प्रेक्षकांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळणं ही गोष्ट कंगनासाठी एखाद्या आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. एका युजरनं लिहिलं, आमची क्वीन कंगना रणौत पुन्हा एकदा कमाल केली आहे. समीक्षकांनी तर या सिनेमाचं कौतुक केलंच आहे पण माझ्याकडून ‘पंगा’ला 4 स्टार अ‍ॅव्हरेज म्हणून देत आहे.

कंगनाचा ‘पंगा’ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एक युजरनं ट्विटरवर लिहिलं, हा सिनेमा खूपच दमदार आहे. नक्कीच ‘पंगा’ 100 कोटी पार करेल. सर्वच महिलांसाठी कंगनाची भूमिका प्रेरणादायी आहे. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘कंगना खऱ्या अर्थानं ही भूमिका जगली आहे. आपल्या मुलासाठी नेहमी तिचं काळजी करणं, आपल्या आवडीचा खेळ खेळताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा खरा भासतो. या सिनेमासाठी तिनं फारसा मेकअप केलेला नाही. याशिवाय तिचं फिजिकल ट्रान्सफर्मेशन कमालीचं आहे.’

‘पंगा’ला एकूणच सर्वांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. या सिनेमाबद्दल बोलायचं तर कंगनानं या सिनेमात एका अशा महिलेची भूमिका साकरली आहे. जी एका सामान्य महिलेप्रमाणेच आहे. पण स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती एक पाऊल पुढे टाकते आणि ते पूर्ण सुद्धा करुन दाखवते. कंगना व्यतिरिक्त या सिनेमात नीना गुप्ता, रिचा चढ्ढा आणि जस्सी गिल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

First published: January 24, 2020, 3:35 PM IST

ताज्या बातम्या