झी मराठीने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, पांडू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा सोनालीचा हा फसलेला प्रॅन्क. या सिनेमाचा आता 30 जानेवारीला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. यानिमित्त झीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. वाचा-'....जग जिंकल्याचा आनंद होतोय', 'पांडू'च्या यशानंतर म्हादूची खास पोस्ट झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'पांडू' सिनेमाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे. तर चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे. मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असलेला 'पांडू' हा येत्या 30 जानेवारीला प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या पांडू सिनेमातील भूमिकांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यांच्यासोबत या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता माळी यांसारखे नावाजलेले कलाकार होते.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Zee Marathi