Home /News /entertainment /

'....जग जिंकल्याचा आनंद होतोय', 'पांडू'च्या यशानंतर म्हादूची खास पोस्ट

'....जग जिंकल्याचा आनंद होतोय', 'पांडू'च्या यशानंतर म्हादूची खास पोस्ट

झी स्टुडिओजच्या ‘पांडू’ (Pandu) चित्रपटाने थेटरमध्ये 50 दिवस पूर्ण केले आहेत. या सिनेमात पांडू आणि म्हादू यांच्या जोडीने धमाल उडवून दिली आहे.

  मुंबई, 22 जानेवारी- झी स्टुडिओजच्या ‘पांडू’ (Pandu) चित्रपटाने थेटरमध्ये 50 दिवस पूर्ण केले आहेत. या सिनेमात पांडू आणि म्हादू यांच्या जोडीने धमाल उडवून दिली आहे. पांडूची भूमिका भाऊ कदम आणि म्हादूची भूमिका कुशल बद्रिकेने साकारली आहे. या सिनेमातील गाणी असतील डायलॉग असतील याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. आता या सिनेमाला 50 दिवस पूर्ण झाल्याबद्दल कुशल बद्रिकाला त्याच्या घरच्यांनी एक खास सरप्राईज दिलं आहे. याबद्दलचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कुशल बद्रिकेने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, पांडू ने थेटरात 50 दिवस लोकांचे मनोरंजन केलं म्हणुन दिलेली ही शाब्बासकीची थाप. “घरातल्यांनी केलेल्या आपल्या कौतुकात जग जिंकल्याचा आनंद होतो”. घरच्यांनी त्याच्या कामाचे कौतुक करत त्याच्यासाठी एक चॉकलेट कप केकचा बॉक्स दिला आहे. यावर त्याच्यासाठी एक खास पोस्ट देखील केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, पांडू सिनेमाच्या यशस्वी वाटचालीबद्दल आपले मनस्वी अभिनंदन! त्याच्या या पोस्टनंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाचा-'अग्गंबाई सासूबाई'तील असावरी- अभिजीत पुन्हा एकत्र ; न्यू प्रोजक्टला सुरूवात झी स्टुडिओच्या ‘पांडू’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपासून गावागावांतही अनेक ठिकाणी पांडूने हाउसफुल्लचे बोर्ड झळकवले. आता या सिनेमाने थेटरमध्ये 50 दिवस पूर्ण केले आहेत. मराठी चित्रपटासाठी ही कौतुकास्पद गोष्ट आहे. या सिनेमाती भाऊ आणि कुशलची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्यांच्या अभिनयाने आणि कॉमेडी सेन्सेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या सिनेमात भाऊ कदम, कुशल बद्रिके, प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी तसेच प्रविण तरडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
  कुशल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो अनेकदा चला हाव येऊ द्याच्या सेटवरील काही गंमती शेअर करत असतो. शिवाय तो घराच्यांसोबत देखील व्हिडिओ तसेच भन्नाच रील देखील शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या