पंडित जसराज यांचं पार्थिव अमेरिकेतून मुंबईत; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

पंडित जसराज यांचं पार्थिव अमेरिकेतून मुंबईत; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराज (Padma Vibhushan Pandit Jasraj) यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काही काळ मुंबईत ठेवण्यात येईल आणि बंदुकीच्या 21 फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात येईल.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराज (Padma Vibhushan Pandit Jasraj) यांचं पार्थिव अमेरिकेतून मुंबईत आणण्यात आलं  त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अमेरिकेतून मुंबईत पार्थिव आणलं त्यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.  त्यांची मुलगी दुर्गा जसराज, पत्नी मधुरा जसराज आणि मुलगा शारंग देव यावेळी उपस्थित होते.

सोमवारी 17 ऑगस्ट रोजी भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचे निधन झाले. पंडित जसराज यांनी अमेरिकेत न्यू जर्सी याठिकाणी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.

पंडित जसराज यांचं पार्थिव गुरुवारी वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. विले पार्ले येथील स्मशानभूमीत पंडित जसराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी राज्य सरकारतर्फे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होतील. बंदुकीच्या 21 फैरी झाडून पंडितजींना मानवंदना देण्यात येईल.

(हे वाचा-तपासासाठी CBIची टीम मुंबईकडे होणार रवाना, वाचा SCच्या निर्णयातील 10 ठळक मुद्दे)

पंडित जसराज यांचा जन्म 24 जानेवारी 1930 ला झाला. शास्त्रीय गायकांपैकी ते एक भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. जसराज हे मेवाती घराण्यातील आहेत. जसराज हे जेव्हा चार वर्षांचे होते त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंडित मोतीराम यांचं निधन झालं. त्यानंतर मोठा भाऊ पंडित मणिराम यांनीच जसराज यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना लहानाचं मोठं केलं.

पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ "पंडितजराज" असं नाव दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पंडित जसराज 90 वर्षांचे होते. न्यूजर्सीत शिष्य आणि परिवारासमवेत त्यांचं वास्तव्य होतं.

(हे वाचा-SCच्या निर्णयानंतर सुशांतच्या बहिणीने मानले देवाचे आभार, अंकिता म्हणाली...)

सोमवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुग्णालयात दाखल व्हायला मात्र त्यांनी नकार दिला. दीर्घश्वास घेतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. पंडित जसराज यांना 2000 साली पद्मविभूषण सन्मान देण्यात आला होता. याशिवाय संगीत नाटक अकादमीच्या सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं.

मराठी मातीशी नातं

हरियाणात जन्मलेल्या जसराज यांचे महाराष्ट्राशी अधिक ऋणानुबंध होते. त्यांची पत्नी मधुरा मराठी आहेत. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा शांताराम यांच्याशी 1962 मध्ये त्यांचा विवाह झाला. पंडित जसराज यांनी मराठी गीतेही गायली आहेत. भारताबरोबरच जगभरात पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. अमेरिका आणि कॅनडातही अनेक वर्षं त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे कित्येकांना दिले.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 19, 2020, 5:13 PM IST
Tags: jasraj

ताज्या बातम्या