मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Panama Papers leak case: ईडी कार्यालतून बाहेर पडताना ऐश्वर्या राय कॅमेरात कैद, VIDEO आला समोर

Panama Papers leak case: ईडी कार्यालतून बाहेर पडताना ऐश्वर्या राय कॅमेरात कैद, VIDEO आला समोर

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिला 2016 च्या पनामा पेपर्स लीक प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात  अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले होते. आज या प्रकरणात चौकशीसाठी ऐश्वर्या दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाली.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

नवी दिल्ली, 20 डिसेंबर- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिला 2016 च्या पनामा पेपर्स लीक प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात  अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले होते. आज या प्रकरणात चौकशीसाठी ऐश्वर्या दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाली. अभिनेते अमिताभ बच्चन यांची सून असणाऱ्या ऐश्वर्याची ईडीने फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत चौकशी केली. त्यानंतर रात्री सातच्या सुमारास ऐश्वर्या ईडी कार्यालयातून बाहेर पडताना दिसली.

न्यूज एजन्सी एएनआयने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन ईडी कार्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. हे प्रकरण 2016 मध्ये वॉशिंग्टन स्थित इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (ICIJ) ने पनामाच्या लॉ फर्म मोसॅक फोन्सेकाच्या रेकॉर्ड तपासाशी संबंधित आहे. याला पनामा पेपर्स म्हणूनही ओळखले जाते. यामध्ये अनेक जागतिक नेत्यांची आणि सेलिब्रिटींची नावे समोर आली, ज्यांनी देशाबाहेरील कंपन्यांमध्ये परदेशात पैसा जमा केल्याचा आरोप आहे. यापैकी काहींची वैध विदेशी खाती असल्याचे सांगितले जाते.

वाचा-पनामा पेपर्स प्रकरण: चौकशीसाठी ऐश्वर्या राय बच्चन दिल्लीत ED समोर हजर

दरम्यान, पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. या लोकांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. याबाबत कर अधिकारी तपास करत आहेत. पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. या प्रकरणात महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात पोहोचला होता. त्याने ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत.

काय आहे पनामा पेपर्स प्रकरण?

2016 मध्ये, ब्रिटेनमध्ये पनामाच्या लॉ फर्मचे 11.5 कोटी टॅक्स डॉक्युमेंट लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे.

वाचा-पनामा पेपर्स प्रकरण: Aishwarya Rai आज दिल्लीमध्ये ED समोर होणार हजर

एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामासमध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होती. या 1993 मध्ये तयार करण्यात आल्या. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स दरम्यान होते, परंतु या कंपन्या त्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्यांची किंमत कोट्यावधी होती.

First published:

Tags: Aishwarya rai, Amitabh Bachchan, Bollywood News, Entertainment