मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फक्त 12 दिवस टिकलं लग्न, नवऱ्याने पत्नीसाठी वारशात ठेवली इतकी रक्कम, चक्रावून जाल!

फक्त 12 दिवस टिकलं लग्न, नवऱ्याने पत्नीसाठी वारशात ठेवली इतकी रक्कम, चक्रावून जाल!

हॉलिवूड स्टार पामेला एंडरसनचा माजी पती जॉन पिटर्स यांनी त्यांच्या वारशामध्ये पामेलाचं नाव समाविष्ट केलं आहे. पामेलासाठी जॉन पिटर्स यांनी 1 कोटी डॉलर वेगळे ठेवले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी : हॉलिवूड स्टार पामेला एंडरसनचा माजी पती जॉन पिटर्स यांनी त्यांच्या वारशामध्ये पामेलाचं नाव समाविष्ट केलं आहे. पामेलासाठी जॉन पिटर्स यांनी 1 कोटी डॉलर वेगळे ठेवले आहेत. एसशोबिजच्या रिपोर्टनुसार पामेलाने 2020 च्या सुरूवातीला एकूण 12 दिवस 77 वर्षांच्या विवाहित जॉन पिटर्स यांच्यासोबत घालवले. या दोघांचं लग्न फक्त 12 दिवस टिकलं. पामेलाला पैशांची गरज असो वा नसो मी तिच्यासाठी पैसे सोडणार आहे, मी कायमच तिच्यावर प्रेम करेन, असं जॉन पिटर्स म्हणाले.

मी पामेलावर मनापासून प्रेम करेन. मी माझ्या मृत्यूपत्रातले 10 मिलियन डॉलर तिच्यासाठी ठेवले आहेत. तिला तसंच आणखी कुणालाही याबाबतची माहिती नाही. मी याचा खुलासा पहिल्यांदाच करत आहे. खरंतर मी हे सांगितलं नाही पाहिजे. हे पैसे तिच्यासाठी आहेत, तिला गरज नसली तरी, अशी प्रतिक्रिया जॉन पिटर्स यांनी दिली.

पामेला एंडरसन 25 वर्षीय मॉडेल डायलनची आई आहे, तसंच तिचा 24 वर्षांचा मुलगा ब्रेंडन माजी पती टॉमी लीसोबत आहे. याआधी पामेलाने रिक सॉलोमन, किड रॉक आणि डेन हेहस्नटसोबतही लग्न केलं होतं. जॉन आणि पामेला यांचं लग्न फक्त एका टेक्स्ट मेसेजवर मोडलं.

लग्नाच्या या पूर्ण घटनेने मी घाबरलो आहे. 74 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय प्रेम संबंधांपेक्षा साधं, सरळ आणि शांत आयुष्य जगण्याची गरज आहे, हे मला कळालं आहे. मी काही दिवस लांब जावं, हेच योग्य आहे. आम्ही काय केलं हे जगाला माहिती आहे, मला वाटतं आता आम्ही वेगळ्या दिशेने जाणं गरजेचं आहे, असं जॉन पिटर्स म्हणाले.

First published: