मुंबई, 09 डिसेंबर : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पल्लवी पाटील. 'रुंजी' या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणारी पल्लवी काही काळातच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर केलेल्या 'अग्निहोत्र २' मालिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. आता पल्लवीचा प्रवास छोट्या पडद्यापुरताच मर्यादित राहिलेला नसून लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतीच तिने याविषयी घोषणा केली असून चाहते तिचं कौतुक करत आहेत. पण त्याआधी तिने असं काही केलंय कि सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरली आहे.
पल्लवी पाटील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. आताही तिची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. पल्लवीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. रिक्षात बसल्याचा हा फोटो असून यावर तिने पोस्टही लिहिली आहे. फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणेच पल्लवीने रिक्षा चालकाच्या बाजूला बसून प्रवास केला आहे. पण एवढंच नाही तर तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शनची चर्चा होतेय.
हेही वाचा- Tejaswini Lonari: तेजस्विनीच्या घरी आली बिग बॉसची ट्रॉफी; नेमकं काय आहे प्रकरण?
हा फोटो शेअर करत पल्लवीने म्हटलंय कि, “मला नेहमीच रिक्षा चालकांच्या बाजूला बसून प्रवास करायचा होता. त्याबरोबरच ते गाव पहायचं होतं. त्यांच्या घरी कोण कोण असतं पासून त्यांना खरंच मज्जा येते का हे काम करताना असे सगळे प्रश्न…आपण कधीच बाजूला बसू शकत नाही. पहिलं ही नव्हतं. मुली बसत नाहीत!! आपली चौकट नकळत आपण निर्माण करतो. माझी चौकट मी मोडली ह्याचा खूप आनंद झाला आणि समाधान देऊन गेलं. तुम्ही पण करून पाहा… मज्जा येते” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
पल्लवीची ही पोस्ट चाहत्यांना चांगलीच भावली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. पल्लवीचं कौतुक करताना चाहते दिसत आहेत. एका चाहत्याने तिला 'तु आयुष्यात येणाऱ्या अशा अनेक चुकीच्या चौकटी मोडीत काढून पुढे जाशील' असं म्हटलंय तर दुसऱ्याने 'चौकट मोडणं खूप महत्त्वाचं आहे, कौतुक आहे तुझं' अशा कमेंट केल्या आहेत.
दरम्यान पल्लवीच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचं तर लवकरच ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाच्या कथेवर 'छोरी' या हिंदी चित्रपटात पल्लवी महत्वाची भूमिका साकारणार आहे. नुकतीच याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. या चित्रपटात नुसरत भरुचा हि अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेता गष्मीर महाजनी आणि पल्लवी पाटील हे मराठी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून आता पल्लवी पाटीलला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.