सोपं नव्हतं श्वेता तिवारीचं लाइफ, मुलीनं सांगितलं घटस्फोटानंतर कशी होती आईची अवस्था

सोपं नव्हतं श्वेता तिवारीचं लाइफ, मुलीनं सांगितलं घटस्फोटानंतर कशी होती आईची अवस्था

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पलकनं तिच्या आईच्या लाइफमधील घटस्फोटानंतर आलेल्या चढ-उतारांवर भाष्य केलं.

  • Share this:

मुंबई, 12 मे : आईच्या सर्वांत जवळची व्यक्ती तिची मुलं असतात. कोणत्याही मुलांसाठी त्यांची आईच त्यांची सर्वात चांगली मैत्रीण असते. असंच नातं आहे श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक यांच्यामध्ये. श्वेताची मुलगी पलक सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेकदा ती आई श्वेतासोबत फोटो शेअर करत असते. तसं पाहायला गेलं तर पलक सौंदर्याच्या बाबतीत तिच्या आईलाच टक्कर देते. मात्र या फोटोंवरुन या दोघींमध्ये मैत्रीचं नातं असल्याचं लक्षात येतं. श्वेताच्या सर्वांत जवळची व्यक्ती असलेल्या पलकनं तिच्या आईच्या सर्वांत कठीण काळाबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत बरेच खुलासे केले आहेत.

पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पलकनं तिच्या आईच्या लाइफमधील घटस्फोटानंतर आलेल्या चढ-उतारांवर भाष्य केलं. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर श्वेताच्या आयुष्यात काय बदल झाले आणि या परिस्थितीत तिनं स्वतःला कसं सावरलं आणि या सर्वांतून ती कशी बाहेर पडली याबाबत पलकनं खुलासे केले आहेत.

VIDEO: कोरोनाविरोधात 9 देशातील 17 कलाकार एकत्र, भारतीय संगीतातून शांतीचा संदेश

 

View this post on Instagram

 

Styledby @stylingbyvictor @sohail__mughal__ Outfit @jiyabyveerdesign Accessories @the_jewel_gallery

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत पलक म्हणाली, मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. लहान असताना जेव्हा ती टीचरसोबत मीटिंगसाठी येत असे. त्यावेळी मला तिचा खूप अभिमान वाटत असे की ती माझी आहे. आईचा अभिमान वाटण्यासाठी तुमची आई फेमस असण्याची गरज नाही. तुमच्यासाठी त्यांचं तुमच्यावर असलेलं प्रेम पुरेसं असतं.

व्हायरल होतोय कपूर सिस्टर्सचा थ्रोबॅक PHOTO, करिना-करिश्माला ओळखणंही झालं कठीण

पलक पुढे म्हणाली, मी माझ्या आईला मोठमोठ्या संकटांचा सामना करताना पाहिलं आहे. आमच्या खासगी जीवनात आम्हाला अनेक लढाया लढाव्या लागल्या. मी माझ्या आईला प्रत्येक गोष्टीचा सामना करताना पाहिलं आहे. अशा गोष्टी ज्या आता माझ्या लाइफमध्येही येत आहेत. मी तिला जेवढं ओळखते तेवढं जास्त तिच्याबद्दल विचार करते. सर्वकाही घडून गेल्यावही ती कशी आहे आणि ती जशी आहे तशी का आहे हा प्रश्न मला अनेकादा पडतो.

 

View this post on Instagram

 

So proud to be your daughter ❤️ #mynumberek

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

पलक सांगते, आईनं कधीच तिच्या कठीण दिवसांना स्वतःवर भारी पडू दिलं नाही. जेव्हा तुम्ही अनेक संकंटांनी घेरलेले असता तेव्हा तुमच्या मनात अनेक नकारात्मक गोष्टी येतात. पण आईनं स्वतःच्या बाबतीत असं कधीच होऊ दिलं नाही. जेव्हा तिच्या खासगी आयुष्यात अनेक संकट आली होती तेव्हा तिनं दुप्पट बळानं त्यावर मात केली. फार कमी वयात कामाला सुरुवात करून तिनं त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आज मला तिचा अभिमान वाटतो की, एवढं काही होऊनही तिनं आम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट दिली.

'थोडी इज्जत दिखा, एक सॅल्यूट तो मार' जितेंद्र जोशीचं वॉरियर्ससाठी दमदार रॅप साँग

First published: May 12, 2020, 8:24 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading