Pal Pal Dil Ke Pas Trailer रिलीज, या कारणानं लाँचला पोहोचू शकला नाही सनी देओल

Pal Pal Dil Ke Pas Trailer रिलीज, या कारणानं लाँचला पोहोचू शकला नाही सनी देओल

बॉलिवूड अभिनेता सनी देओल लवकरच ‘पल पल दिल के पास’ या सिनेमातून त्याचा मुलगा करण देओलला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे.

  • Share this:

मुंबई, 05 जुलै : बॉलिवूड अभिनेता सनी देओल लवकरच ‘पल पल दिल के पास’ या सिनेमातून त्याचा मुलगा करण देओलला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवासांपासून तो खूपच चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून या कार्यक्रमाला सनी देओल मात्र स्वतः उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे वडीलांच्या अनुपस्थितीतच करणनं आजोबा धर्मेंद्र यांचाहस्ते त्यांच्या पहिल्या वहिल्या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

काही दिवासांपूर्वी सनी देओलच्या मतदार संघात फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्यानं तो त्या ठिकाणी रवाना झाला. त्यामुळे तो या ट्रेलर लाँचिगला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे करणचे आजोबा आणि बॉलिवूडचे अभिनेता धर्मेंद्र यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा ट्रेलर आपल्या ट्विटरवर शेअर करत त्यांनी लिहिलं, प्रत्येक पीढीची स्वतःची लव्हस्टोरी असते. ही या पीढीची लव्हस्टोरी.

'History'वर 'महाकालेश्वर-लीजण्ड ऑफ शिवा'मध्ये इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन

धर्मेंद्र यांच्याच सुपरहिट गाण्यावरून घेतलं आहे सिनेमाचं नाव

करण देओल या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सनी देओलन केलं आहे. या सिनेमाचं नाव सनीचे वडील धर्मेंद्र यांच्या 'जब हम जवां होंगे' या सिनेमातील 'पल पल दिल के पास तुम रहती हो' या गाण्यावरुन घेतलं आहे. हे गाणं धर्मेंद्र आणि राखी यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. याच गाण्यावरुन या सिनेमाचं नाव 'पल पल दिल के पास' असं ठेवण्यात आलं आहे. या सिनेमात नवोदित अभिनेत्री सेहेर बांबा करण देओलसोबत स्क्रिन शेअर करत आहे.

अंबानींच्या गणेश पूजेला प्रियांकाच्या भावासोबत दिसलेली ती 'मिस्ट्री गर्ल कोण?

काय आहे कथा

करण आणि सेहेर हे दोघं एका ट्रेकींग प्रोग्रामध्ये भेटतात. सुरुवातीला एकमेकांचा राग करणारे हे दोघंही काही एडव्हेंचर अॅक्टिव्हिटी दरम्यान एकत्र येतात. मात्र करणला तो सेहेरवर प्रेम करत असल्याची जाणीव खूप उशीरा होते. तो याची कबुली देईपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि त्यानंतर सुरु होतो अॅक्शन ड्रामा...

कृती सेननने आत्तापर्यंत किती मुलांना केलंय डेट? बहिणीनं केला खुलासा

==========================================================

दबंग सलमानच्या बॉडिगार्डचं पत्रकारासोबत गैरवर्तन; मोबाइल हिसकावला VIDEO VIRAL

Published by: Megha Jethe
First published: September 5, 2019, 6:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading