आता आलं सोनूचं 'पाकिस्तानी' व्हर्जन!

आता आलं सोनूचं 'पाकिस्तानी' व्हर्जन!

'कराची विन्झ' या पाकिस्तानी कॉमेडियन्सच्या ग्रुपने या गाण्याच्या पाकिस्तानी व्हर्जनचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलाय.

  • Share this:

30जुलै: 'सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का' या गाण्याने संपूर्ण भारताला वेड लावलं आहे. हिंदी, पंजाबी, तामिळ अशा अनेक भाषांमध्ये या गाण्याचे व्हर्जन निघालेत. पण आता या गाण्याची ख्याती भारत देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता याच गाण्याचं एक पाकिस्तानी व्हर्जनही आलंय.

'कराची विन्झ' या पाकिस्तानी कॉमेडियन्सच्या ग्रुपने या गाण्याच्या पाकिस्तानी व्हर्जनचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलाय. पण गंमत म्हणजे या गाण्यात भरोसा नाय का असा प्रश्न विचारलाच नाही. तर आमचा भरोसा योग्यच होता असं म्हटलंय.

हे गाणं पनामा पेपर्सच्या पार्श्वभूमीवर बनवलं गेलंय. इम्रान खान यांच्या 'तेहरीक ए इन्साफ' या पक्षाने नवाझ शरीफ यांच्या पनामा पेपर्सच्या भ्रष्टाचाराविरूद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने नवाझ शरीफांना दोषी ठरवलं आणि त्यांना पंतप्रधानपदास अपात्र ठरवलं. या निकालाने पाकिस्तानात राजकीय खळबळ माजवली आहे.

या गाण्यात इम्रान खान आमचा तुमच्यावरचा विश्वास खराच होता असं एकीकडे म्हटलंय तर दुसरीकडे नवाझ शरीफ आणि त्यांच्या पक्षावर कडाडून टीका केलीय.हा व्हिडिओ पाकिस्तानात खूप व्हायरल होतोय. काही लोकं या व्हिडिओवर भारतातल्या गाण्याचं पाकिस्तानी व्हर्जन असल्यानं प्रचंड  टीकाही करत आहे

चला तर मग आपणही पाहूयात सोनूच्या गाण्याचं हे पाकिस्तानी व्हर्जन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 06:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading