हे सुधारणारच नाहीत! प्रियांका-दीपिकाला पाहिल्यावर येते उलटी, पाकिस्तानी अँकर बरळला

हे सुधारणारच नाहीत! प्रियांका-दीपिकाला पाहिल्यावर येते उलटी, पाकिस्तानी अँकर बरळला

पाकिस्तानी अँकरचं प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोणबाबत संतापजनक विधान.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानं बॉलिवूड सिनेमांवर बंदी घातली. तसेच भारतीय जाहिराती सुद्धा पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आल्या. त्यानंत अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारताबद्दल उलट सुलट बोलायला सुरुवात केली. ज्यावरून भारत विरुद्ध पाकिस्तान असं ट्विटर वॉर मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशात आता आणखी एका पाकिस्तानी अँकरची भर पडली आहे. या अँकरनं बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्याबात अतिशय संतापजंनक विधान केलं ज्यामुळे कोणत्याही भारतीय व्यक्तीचा राग अनावर होऊ शकतो. या अँकरनं दीपिका आणि प्रियांच्या दिसण्यावर आणि त्याच्या चेहऱ्यावर कमेंट करणारा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल आहे.

पाकिस्तानी अँकर वकार जका (Waqar Zaka) यानं त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात त्यानं बॉलिवूड अभिनेत्रींना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं दीपिका आणि प्रियांकाच्या चोहऱ्याबाबत उलट सुलट विधानं केली आहे. तसेच या अभिनेत्रींना पाहिल्यावर मला उलटी आली असं संतापजनक वक्तव्य या अँकरनं त्याच्या व्हिडीओमध्ये केलं आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका सध्या ग्लोबल स्टार आहेत. अशातच या अँकरनं या अभिनेत्रींबाबत असं वक्तव्य करत पाकिस्तानातील अभिनेत्री किती सुंदर आणि नॅचरल ब्यूटी आहेत हे सांगत दीपिका आणि प्रियांकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

शाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया

वकार जाकानं त्याच्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारतीय अभिनेते आणि अभिनेत्रीचे बिलबोर्ड्स हटवण्याची मागणी केली आहे. सोबतच मल्टीनॅशनल कंपन्यांना पाकिस्तानात बिझनेस करायचा असेल तर त्यांनी त्यासाठी त्यांनी भारतीय कलाकारांना अप्रोच न करता त्याऐवजी पाकिस्तानी कलाकारांनाच संधी द्यावी असंही म्हटलं आहे. तो म्हणाला, ‘ज्यावेळी मी दीपिका पदुकोणला समोर पाहिलं होतं त्यावेळी मला उलटी आली होती. तर प्रियांका चोप्राला पाहिल्यावर मला कसंतरीच झालं होतं असा तिचा चेहरा आहे. तिनं एखाद्या चांगल्या सर्जनला दाखवून प्लास्टिक सर्जरी करायला हवी.’

कार्तिकसोबत सारा अली खान पोहोचली हॉस्पिटलमध्ये, 'हे' आहे कारण

वकार जाकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. वकार एक व्हिडीओ जॉकी असण्यासोबत सोशल अ‍ॅक्टीविस्ट सुद्धा आहे. त्याच्या या व्हिडीओंना बारतीय युजर्सनी खूप ट्रोल केलं असून प्रियांका-दीपिका सारख्या ग्लोबल स्टार्सना ट्रोल करण्याचा वकारचा प्रयत्न हाणून पाडला आहे. याआधीही वकारनं भारताच्या विरोधात काही व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.

बॉलिवूडच्या 'हसीना', ज्यांनी आपल्या नॅचरल ब्युटीनं अनेकांना केलं घायाळ!

=============================================================

VIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव!

Published by: Megha Jethe
First published: August 25, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading