राहत फतेह अली खान यांनी केली तस्करी; EDने मागितलं अडीच कोटींचं स्पष्टीकरण

राहत फतेह अली खान यांनी केली तस्करी; EDने मागितलं अडीच कोटींचं स्पष्टीकरण

राहत यांनी दंड भरला नाही तर आजन्म भारतात येण्यावर बंदी येऊ शकते.

  • Share this:

मुंबई, ३० जानेवारी २०१९- पाकिस्तानी सूफी गायक राहत फतेह अली खान यांच्यावर परदेशी चलनाची तस्करी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ED ने राहत फतेह अली खान यांना फेमाअंतर्गत नोटीस पाठवली असून ईडीने राहत यांच्याकडे २ कोटी ६१ लाख रुपयांच्या रक्कमेचं उत्तर मागितलं आहे.

जर राहत यांनी दिलेलं उत्तर ईडीला पटलं नाही तर त्यांना ३०० टक्के दंड आकारण्यात येईल. तसंच त्यांनी दंड भरला नाही तर राहत यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी होऊ शकते. यामुळे त्यांना आजन्म भारतात येण्यास बंदी येऊ शकते. एबीपी न्यूजने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार. राहत यांना भारतात अवैधरित्या ३० लाख ४० हजार यूएस डॉलर मिळाले. यातले राहत यांनी २ लाख २५ हजार डॉलरची तस्करी केली.

२०११ मध्ये राहत फतेह अली खान यांनी दिल्लीत IGI विमानतळावर सव्वा लाख डॉलरसह अटक करण्यात आली होती. राहत यांच्याकडे या पैशांची कोणतीही कागदपत्र नव्हती. राहत यांच्याबरोबर त्यांचे व्यवस्थापक मारूफ आणि इव्हेंट मॅनेजर चित्रेश यांनाही अटक करण्यात आली होती.

राहत दुबई मार्गाने लाहोरला जात असताना त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी राहत यांच्या बॅगेतून २४ हजार डॉलर मिळाले. तर मारूफ आणि चित्रेशच्या बॅगमधून प्रत्येकी ५० हजार डॉलर जप्त करण्यात आले. डीआरआयने त्यावेळी स्पष्ट केले होते की, राहत यांच्याकडे जेवढी रक्कम होती ती ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा किती तरी पटीने जास्त होती.

राहत फतेह खान यांनी २००३ मध्ये बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यांनी ‘पाप’ सिनेमात ‘लागी तुझसे मन की लगन’ हे पहिलं गाणं गायलं होतं. याशिवाय ‘इश्किया’ सिनेमातील ‘दिल तो बच्चा है जी’ गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता.

VIDEO : आपल्यापेक्षा 36 वर्ष लहान असलेल्या 'या' अभिनेत्याला रेखाने मारली मिठी

First published: January 30, 2019, 10:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading