'तु खरंच लायक आहेस का?' कलम 370वर वादग्रस्त ट्विट करणाऱ्या आतिफ असलमला नेटकऱ्यांनी झापलं

पाकिस्तानी गायक अतिफ असलमनं कलम 370 बाबत केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 09:34 AM IST

'तु खरंच लायक आहेस का?' कलम 370वर वादग्रस्त ट्विट करणाऱ्या आतिफ असलमला नेटकऱ्यांनी झापलं

मुंबई, 8 ऑगस्ट : भाजपा सरकारनं नुकतंच काश्मीरमधील वादग्रस्त कलम 370 रद्द केलं. यानंतर देशभरातून लोक सरकारचं कौतुक करत असतानाचं पाकिस्तानातून मात्र भारतावर टीका होताना दिसत आहे. पाकिस्तानचे फक्त राजकीय नेतेच नाहीत तर अनेक पाकिस्तानी कलाकारही यावरून भारत सरकार टीका करत आहेत. नुकतंच पाकिस्तानी गायक अतिफ असलमनं कलम 370 बाबत केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. अतिफनं केलेल्या या वादग्रस्त ट्वीटमुळे त्याला भारतीय चाहत्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे.

सोनाक्षी सिन्हाला अटक झाल्याची बातमी खरी की खोटी? समोर आला हा VIRAL VIDEO

बॉलिवूडमध्ये अनेक हीट गाणी देणारा पाकिस्तानी गायक अतिफ असलमनं त्याच्या ट्विटर अकाउंवरून काश्मीरमधील कलम 370 कलम रद्द केल्याबाबत एक पोस्ट शेअर केली. त्यानं लिहिलं, ‘तुमच्या सर्वांशी एक मोठी बातमी शेअर करताना आनंद होत आहे. इंशाअल्लाह मी लवकरच माझ्या जीवनातील एक महत्त्वाच्या प्रवासाला निघणा आहे. पण ‘हज’ला जाण्यापूर्वी सर्वांची माफी मागतो. माझे मित्र, माझे चाहते किंवा माझ्या कुटुंबीयांपैकी मी कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा.’ या सोबतच या ट्वीटमध्ये त्यानं पुढे लिहिलं, ‘यासोबतच मी काश्मीरमधील लोकांसोबत होत असलेली हिंसा आणि अत्यांचारांचा निषेध करतो. काश्मीर आणि जगातील सर्वांचं देव रक्षण करो’

एअरपोर्टवर लगेज सांभाळताना दिसली सारा अली खान, फॅन्स म्हणाले...

Loading...

सोशल मीडियावरील या पोस्टनंतर अतिफला त्याच्या भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी अतिफला चांगलंच झापलेलं दिसत आहे. एक युजरनं लिहिलं, ‘हज’ सारख्या पाकिस्तानी यात्रेचं नाव घेत असं वादग्रस्त केल्यानंतर तुला खरंच वाटतं का त्या यात्रेला जाण्याच्या लायकीचा आहेस.’ अशा प्रकारे अनेक भारतीय चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी : कोंडाजींना जाळ्यात पकडण्यासाठी लवंगीचा 'असा' डाव

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर कडक कारवाई करत त्यांना बॉलिवूडमधून पूर्णपणे बॅन केलं गेलं आहे. तर अभिनेता सलमान खाननं त्याच्या बॅनरखाली तयार झालेला सिनेमा नोटबुकमधून अतिफ असलमची गाणी वगळली होती.

==========================================================================

VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 09:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...