मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने केला लैगिंक अत्याचाराचा आरोप; सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने केला लैगिंक अत्याचाराचा आरोप; सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा

बॉलिवूडमधीलअभिनेता-अभिनेत्री विवाह बंधनात अडकल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर झळकत असतात. जोडप्यांमध्ये वितुष्ट आल्यानंतर विभक्त होण्याची घोषणाही आजकाल ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्राम अशा माध्यमांवर केली जात आहे.

बॉलिवूडमधीलअभिनेता-अभिनेत्री विवाह बंधनात अडकल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर झळकत असतात. जोडप्यांमध्ये वितुष्ट आल्यानंतर विभक्त होण्याची घोषणाही आजकाल ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्राम अशा माध्यमांवर केली जात आहे.

बॉलिवूडमधीलअभिनेता-अभिनेत्री विवाह बंधनात अडकल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर झळकत असतात. जोडप्यांमध्ये वितुष्ट आल्यानंतर विभक्त होण्याची घोषणाही आजकाल ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्राम अशा माध्यमांवर केली जात आहे.

मुंबई, 23 सप्टेंबर- बॉलिवूडमधीलअभिनेता-अभिनेत्री विवाह बंधनात अडकल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर झळकत असतात. जोडप्यांमध्ये वितुष्ट आल्यानंतर विभक्त होण्याची घोषणाही आजकाल ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्राम अशा माध्यमांवर केली जात आहे. बॉलिवूडप्रमाणे पाकिस्तानच्या चित्रपटसृष्टीतही असंच काहीसं सुरू असतं. नुकतंच पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानचाकौटुंबिक वाद समोर आलाय. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अलीजे सुल्तान हिनं 4 वर्षांनंतर फिरोजपासून विभक्त होत असल्याचं इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून जाहीर केलयं. . सुल्ताननं इन्स्ट्राग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत फिरोज खानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून, सोशल मीडियावर फिरोज खानला ट्रोल केलं जातंय. फिरोज खानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानची पूर्वाश्रमीची पत्नी अलीजे सुल्ताननं बुधवारी फिरोजवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावलाय. तसंच त्याच्यापासून आपणं वेगळं होत असल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हटलंय. फिरोज व अलीजे हे दोघे विभक्त होणार असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून इंटरनेटवर पाहायला मिळत होत्या. आता अलीजेनं स्वत:च या गोष्टीला दुजोरा दिलाय. अलीजेने तिच्या पोस्टमध्ये गंभीर आरोप लावले आहेत. पोस्टमध्ये ती म्हणते की, लग्नानंतरचा चार वर्षांचा काळ म्हणजे भयावह होता. या काळात मला सतत शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचा सामना करावा लागला. पती सतत ब्लॅकमेल, विश्वासघात, अपमान करत होता. मुलांच्या भवितव्यासाठी घेतला निर्णय अलीजेने तिच्या पोस्टमध्ये विभक्त होत असल्याचं स्पष्ट केलं. यात पुढे ती म्हणते की, हा निर्णय घेताना मी अनेकवेळा विचार केला. संपूर्ण जीवन भीतीदायक पद्धतीनं आपण जगू शकत नाही. माझ्या मुलांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेण्याचं मी ठरवलं आहे. विषारी आणि सतत हिंसेच्या छायेत माझी मुलं मोठी व्हावीत, असं मला कदापि वाटत नाही. या वातावरणात मुलांचा मानसिक विकास आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ शकतो. हिंसा हा नातेसंबंधांतील एक भाग असल्याचं समजून मुलांनी मोठं होऊ नयं, असं वाटतं. कुठलीही जखम इतकी खोलवर नसते जी कधी भरून निघू शकणार नाही व जखमेला कुठल्याही परिस्थितीत लपवण्याची आवश्यकता भासणार नाही, याची शिकवण मुलांना देणार असल्याचं सांगत चार वर्षांचं हे नातं तोडत असल्याचा उल्लेख अलीजेने पोस्टमध्ये केलाय. पाकिस्तानी युट्युबरने ट्रोलिंगवर दिली प्रतिक्रिया पाकिस्तानी युट्युबर अर्सलान नसीरनं त्याच्या ट्विटर हँडलवर ट्रोलिंग करणाऱ्यांचा समाचार घेतलाय. यात तो म्हणतो की, मुलगा मुलीला एक्स्पोज करत आहे. मुलाचे मित्र मुलीला एक्स्पोज करत आहेत, पत्नी पतीला एक्स्पोज करतेय पतीचे मित्रही त्याच्या पत्नीला एक्स्पोज करत आहेत आणि आपण सगळे बसून मजा घेत आहोत. इतरांच्या खासगी गोष्टींवर पडदा कायम राहू द्या, अल्लाह तुमच्या खासगी गोष्टीं पडद्याखाली झाकून ठेवेल.
(हे वाचा:Samantha Prabhu: 'या' व्यक्तीमुळे दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली समंथा प्रभू ) फिरोजनेही आरोपांना दिली प्रतिक्रिया फिरोज खानच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती समोर आल्यानंतर लोक त्याच्यावर टीका करत आहेत. पाकिस्तानमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. यावर बोलताना फिरोजनं पाकिस्तानच्या कायद्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलंय. 3 सप्टेंबर 2022 रोजी अलीजेशी घटस्फोट घेण्याचं निश्चित झालं होतं. यानंतर कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल करून मुलांची कस्टडी आणि त्यांना भेटू देण्याची परवानगी त्यानं मागितली आहे.
First published:

Tags: Actor, Entertainment, Pakistan

पुढील बातम्या