Home /News /entertainment /

पाकिस्तानी सिनेसृष्टी बंद होण्याच्या मार्गावर? थिएटर्सची झालीय अशी अवस्था

पाकिस्तानी सिनेसृष्टी बंद होण्याच्या मार्गावर? थिएटर्सची झालीय अशी अवस्था

भारतात (India) अनेक रसिक लोक राहतात. या लोकांनी नेहमीच कलेवर आणि कलाकारावर प्रेम केलं आहे. त्यामुळेच देशाने अनेक विदेशी कलाकरांना लोकप्रियता मिळवून दिली आहे.

    मुंबई, 25 जून-  भारतात   (India)  अनेक रसिक लोक राहतात. या लोकांनी नेहमीच कलेवर आणि कलाकारावर प्रेम केलं आहे. त्यामुळेच देशाने अनेक विदेशी कलाकरांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. पाकिस्तानातील अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्राच्या 'कपूर अँड सन्स' चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान  (Fawad Khan) दिसला होता. तर शाहरुख खानच्या 'रईस' मध्ये अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) झळकली होती. या कलाकारांना प्रेक्षकांनी मोकळेपणाने प्रेम दिलं होतं. त्यांचा चाहतावर्गसुद्धा निर्माण झाला आहे. सध्या हे कलाकार बॉलिवूडमध्ये नसले तरी ते सोशल मीडियावरुन चाहत्यांशी कनेक्टेड असतात. अशातच आता पाकिस्तानी सिनेसृष्टीबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सिनेसृष्टीवर मोठं संकट आलं आहे. हे चित्रपट बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे. वास्तविक या देशातील प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येतच नाहीत, त्यामुळे थिएटर्सचं मेंटेनन्स करणं कठीण झालं आहे. याबाबतचं वृत्त आज तकने दिलं आहे. डॉनच्या रिपोर्टनुसार, कराचीतील प्रसिद्ध चित्रपटगृहाने एक नवी शक्कल लढवली आहे. त्यानुसार फक्त विकेंडलाच चित्रपटगृहात एखादा सिनेमा लावण्याचं ठरवण्यात आलं आहे. कारण पाकिस्तानातील प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये येणं जवळजवळ बंद झालं आहे. (हे वाचा:द्रौपदी मुर्मूवरील 'ते' ट्विट राम गोपाल वर्मांना भोवलं; पोलिसांत पोहोचलं प्रकरण ) कोरोना काळामध्ये चित्रपटगृहे बंद होती. त्यांनतर चित्रपटगृहे सुरु झाली मात्र तोपर्यंत पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक येणं बंद झालं होतं. याचा परिणाम म्हणजे चित्रपटगृहांच्या मालकांना चित्रपटगृहाचा खर्च भागवणं कठीण झालं आहे. असं म्हटलं जात आहे की या चित्रपटगृहांचे वीजबिलसुद्धा थकीत आहेत. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानी सिनेमा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment, Pakistan

    पुढील बातम्या