मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पाकिस्तानातल्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या घरातला वाद चव्हाट्यावर; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली....

पाकिस्तानातल्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या घरातला वाद चव्हाट्यावर; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली....

सबा फैजल

सबा फैजल

पाकिस्तानमधल्या ज्येष्ठ अभिनेत्री सबा फैजल यांच्या घरी सध्या अशीच परिस्थिती आहे. त्यांच्या घरात सासू-सुनेचं जोरदार भांडण होत आहे. सबा यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मोठा मुलगा सलमान आणि सून नेहा मलिक यांच्याबद्दल माहिती दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 डिसेंबर :  अनेक भारतीय टीव्ही मालिकांमध्ये सासू-सुनेचे वाद आणि फॅमिली ड्रामा दाखवला जातो. भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्येही अशाच प्रकारच्या टीव्ही मालिका तयार होतात. एरव्ही टीव्हीवर दिसणारे हे फॅमिली ड्रामाज कधीकधी सत्यातदेखील उतरतात. पाकिस्तानमधल्या ज्येष्ठ अभिनेत्री सबा फैजल यांच्या घरी सध्या अशीच परिस्थिती आहे. त्यांच्या घरात सासू-सुनेचं जोरदार भांडण होत आहे. सबा यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मोठा मुलगा सलमान आणि सून नेहा मलिक यांच्याबद्दल माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये सबा यांनी सांगितलं, की सून नेहामुळे त्यांच्या घरात समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी तिच्यासोबत नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

'इश्क है' फेम सबा फैझल यांचा मुलगा सलमान यानं 2019मध्ये नेहा मलिकसोबत लग्न केलं होतं. या लग्नात पाकिस्तानी इंडस्ट्रीतले अनेक मोठे स्टार उपस्थित होते. काही दिवसांपासून या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. यामुळे सबा फैझलला चाहत्यांकडून खूप कडवट गोष्टीही ऐकाव्या लागल्या होत्या. प्रेक्षकांच्या मनातला द्वेष पाहून त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या, असंही एका टॉक शोमध्ये सांगितलं होतं.

हेही वाचा - Ram Gopal Varma: आधी पायाची मालिश मग केलं किस अन् नंतर....; राम गोपाल वर्माचा अभिनेत्रीसोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

सबा फैझल यांनी आता व्हिडिओच्या माध्यमातून सुनेचा खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सून नेहा मलिकवर मोठे आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, "नेहासारखी नकारात्मक स्त्री कोणाच्याही कुटुंबात आली, तर ती नातेसंबंध बिघडवून ठेवेल. गेल्या चार वर्षांपासून मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक सोशल मीडिया पेजेसनी नेहाला पाठिंबा दिला. मी माझ्या मुलासाठी सर्व सहन केलं. मी गप्प राहिले, माझी मुलगी गप्प राहिली. आता माझा, माझी मुलगी, माझे पती आणि माझा धाकटा मुलगा अर्सलान यांचा नेहाशी काहीही संबंध राहिला नाही. सलमानला तिच्यासोबत राहायचं असेल तर त्यानं राहावं; पण मग त्याच्याशीही आमचा काहीही संबंध राहणार नाही."

नेहा सायकोपॅथ

सबा फैजल यांचा धाकटा मुलगा अर्सलान फैजल यानंही एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून वहिनीचं सत्य लोकांसमोर ठेवलं आहे. अर्सलानने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये वहिनी नेहा मलिकला मनोरुग्ण आणि गुंड म्हटलं आहे. त्यानं लिहिलं आहे, की 'नेहा पहिल्या दिवसापासून कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीला ती 'हराम' म्हणत आहे. गेल्या चार वर्षांपासून आमचा मानसिक छळ होत आहे. माझी आई आणि बहीण गप्प आहेत. मी यापुढे गप्प बसू शकत नाही, त्यामुळे याविरोधात आवाज उठवला आहे.'

नेहा मलिक आपला भाऊ सलमान फैझलला शो बिझनेसमध्ये काम करू देत नसल्याचा दावा अर्सलानने केला आहे. आतापर्यंत कुटुंबीयांनी नेहा आणि सलमानला त्यांना हवे ते सर्व दिलं आहे; पण भविष्यात असं होणार नाही. आता दोघांसोबतचं नातं संपुष्टात आलं आहे.

नेहा मलिकनं दिली प्रतिक्रिया

सबा आणि अर्सलानच्या पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडिया आणि पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. अनेक युझर्स आई-मुलाच्या जोडीला सपोर्ट करत आहेत. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान, नेहा मलिकनेही तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. काही युझर्सच्या कमेंट्सना उत्तर देताना ती म्हणाली, की 'अल्लाहकडून सासरच्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळेल.'

First published:

Tags: Actress, Entertainment