Article 370 ने भडकल्या पाकिस्तानी अभिनेत्री, म्हणाल्या- ‘स्वर्ग जळतोय आणि आपण फक्त रडतोय’

Article 370 ने भडकल्या पाकिस्तानी अभिनेत्री, म्हणाल्या- ‘स्वर्ग जळतोय आणि आपण फक्त रडतोय’

सर्व नियमांचं आणि अधिकारांचं काय झालं जे आपण पुस्तकात वाचली आहेत? त्यांना काही अर्थ आहे का?’

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट- जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सर्वसामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकजण या निर्णयाचीच चर्चा करताना दिसत आहे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत हा प्रस्ताव मांडला. या निर्णयाचा काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाने याला कडाडून विरोध केला. बॉलिवूडमधूनही यावर वेगवेगळ्या रिअक्शन येत आहेत. दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्रीनेही कलम 370 हटवल्यावर ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली. सध्या तिचं हे ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटवरून तिला ट्रोलही केलं जात आहे.

ती पाकिस्तानी अभिनेत्री म्हणजे माहिरा खान (Mahira Khan). माहिराने शाहरुख खानसोबत रईस सिनेमात काम केलं होतं. कलम 370 वर आपली प्रतिक्रिया देताना माहिरा म्हणाली की, ‘जे लोक कश्मीरला तुरुंग बनवायला उत्सुक आहेत आणि याचा आनंद साजरा करत आहेत, त्यांना रोखलं पाहिजे. आपल्या मनात डोकावून पाहा. तेव्हा तुम्हाला काश्मिरी लोकांसाठी सहानुभूती वाटेल. कश्मीर पुन्हा एकदा उघड तुरुंगासारखा झाला आहे.’

माहिरा खानशिवाय अजून एका पाकिस्तानी अभिनेत्रीने काश्मीरच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. मावरा हॉकेनने ट्वीट करत म्हटलं की, ‘हे अमानवीय आहे. आपण काळोखात राहत आहोत का? त्या सर्व नियमांचं आणि अधिकारांचं काय झालं जे आपण पुस्तकात वाचली आहेत? त्यांना काही अर्थ आहे का?’

मोदी सरकारने जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा जो निर्णय घेतला त्याला ऐतिहासिक निर्णय म्हटलं जात आहे. या निर्णयानंतर जम्मू- काश्मीर हे राज्य राहिलं नसून त्याचं दोन भागांत विभाजन करण्यात आलं आहे. जम्मू- काश्मीरसह आता लडाखही केंद्रशासित प्रदेश झाला आहे.

सुरक्षेच्या मुद्यावरून सरकारकडून अनेक तातडीचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात जम्मू- काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच सरकारने याआधी अमरनाथ यात्राही तडकाफडकी रद्द केली होती आणि पर्यटकांना काश्मीर सोडण्याचे आदेश दिले होते.

आजही हे सिनेमे पाहिले तर तुम्ही पुन्हा काश्मीरच्या प्रेमात पडाल!

करून दाखवलं! 27 वर्षांपूर्वीच मोदींनी 370 हटवण्याचा केला होता पण

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा’ या 11 डायलॉगने काढली पाकची इज्जत

SPECIAL REPORT: अमित शाह आणि भाजप विरोधकांच्या फार पुढे गेले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या