पाकिस्तान, 02 ऑक्टोबर: पाकिस्तानचे प्रसिद्ध कॉमेडियन (Pakistan Legendary Comedian) आणि टीव्ही क्षेत्रातील व्यक्तिमत्व उमर शरीफ (Umar Sharif ) यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूप चिंताजनक होती. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या उपचारासाठी पंतप्रधान कार्यालयाकडेही मदत मागितली होती (Umar Sharif Death)
उमर शरीफ 66 वर्षांचे होते. ते अनेक दिवसांपासून आजारी होते आणि बऱ्याच आजाराशी लढत होते. पाकिस्तानच्या कला परिषदेचे अध्यक्ष अहमद शाह यांनी शरीफ यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कॉमेडियन कपिल शर्मानंही उमर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Alvida legend may your soul Rest In Peace #UmerShareef pic.twitter.com/ks4vS4rdL0
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) October 2, 2021
28 सप्टेंबर रोजी उमर शरीफ यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीन खालावत चालली होती. शरीफ यांच्या प्रकृती अस्वस्थतेबद्दल देशभरातील लोक नाराज होते जेव्हा त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना व्हिडिओद्वारे परदेशात जाण्यासाठी व्हिसा देण्याचे आवाहन केलं होतं.
हेही वाचा- बापरे! पाकिस्तानमध्ये 127 रुपये लिटर पेट्रोल, पंतप्रधानांचं स्पष्टीकरण ऐकून लोक उडवतायत खिल्ली
उमर शरीफ यांच्या कुटुंबीयांनी शरीफ यांना उपचारासाठी अमेरिकेत नेण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी आम्ही पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती.
जर्मनीत घेतला अखेरचा श्वास
उमर शरीफ हे 66 वर्षांचे होते. उपखंडातील एक प्रसिद्ध कलाकार आणि निर्माता अशी त्यांची ओळख होती. . गेल्या वर्षी त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली. सर्जरी केल्यानंतर त्यांची स्मरणशक्ती (Amnesia) कमी होत चालली होती आणि त्यांची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत चालली होती.
जर्मनीतील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद फैसल यांनीही ओमर शरीफ यांच्या निधनाचं वृत्त ट्विट केलं आहे. माहिती देताना त्यांनी लिहिलं की, 'उमर शरीफ यांचं जर्मनीत निधन झाल्याची माहिती देताना अत्यंत दुःख होत आहे. त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना आमची संवेदना.
With deep sorrow it is announced that Mr. Umer Sharif has passed away. In #Germany. Our deepest condolences to hie family and friends. Our CG is present at the hospital to assist the family in every way.
— Dr Mohammad Faisal (@DrMFaisal) October 2, 2021
हेही वाचा- कृषी कायद्यांना विरोध हे राजकीय कपट, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
उमर शरीफ यांच्या पत्नीनं मागितली होती मदत
सध्या उमर शरीफ हे व्हीलचेअरचं होते. त्यांना अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्वरित उपचारांची आवश्यकता आहे, असं त्यांची पत्नी जरीन यांनी म्हटलं होतं. जर ते अमेरिकेत जाऊ शकले नाही तर त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन इथं करावं लागेल, जे त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या. मात्र अमेरिकेत जाण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan