Home /News /entertainment /

इम्रान सरकारवर भडकली मिया खलिफा; पाकिस्तानच्या 'या' निर्णयाविरोधात उठवला आवाज

इम्रान सरकारवर भडकली मिया खलिफा; पाकिस्तानच्या 'या' निर्णयाविरोधात उठवला आवाज

मियाचं टिकटॉक अकाउंट पाकिस्तानात बॅन करण्यात (Pakistan bans Mia Khalifa accoun) आलं आहे. त्यामुळे मियाने पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.

  मुंबई 25 मे : पूर्व पॉर्न स्टार मिया खलिफा (Mia Khalifa)  तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच घडलेल्या इस्त्राइल (Israel) आणि पॅलेस्टाइनमधील (Palestine) युद्धावर देखील तिने भाष्य केलं होतं. त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याशिवाय भारतातील शेतकरी आंदोलनावरही (Farmers Protest) तिने भाष्य केलं होतं. तर आता ती भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तान सरकारवर भडकली आहे. मियाचं टिकटॉक अकाउंट पाकिस्तानात बॅन करण्यात (Pakistan bans Mia Khalifa accoun) आलं आहे. त्यामुळे मियाने पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. मियाचं टिकटॉक अकाउंट (Titktok account)  हे पाकिस्तान सरकारने अचानक बॅन केलं. तर त्या संदर्भात कोणतीही पूर्व सुचनाही न दिल्याने मियाने संताप व्यक्त केला आहे.

  चाहत्याचा सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरात राडा, झटापटीत वडील जखमी

   यासंदर्भात तिने ट्विट करत म्हटलं आहे की, ‘पाकिस्तानने माझं टिकटॉक अकाउंट बॅन केलं. आजपासून मी माझे सगळे टिकटॉक व्हिडिओ माझ्या अशा पाकिस्तानी फॅन्ससाठी ट्विटरवर रिपोस्ट करेन, जे कट्टतावादाच्या विरोधात आहेत.’ मियाने अचानक घेण्यात आलेल्या या निर्णायावर रोष व्यक्त केला आहे व कोणतीही कल्पना न देता असा निर्णय घेणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. यावर तिच्या अनेक चाहत्यांनीही तिचं समर्थन केलं आहे. दरम्यान पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने (sensor board) हा निर्णय घेत मिया खलिफाचं अकाउंट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिया नाराज झाली आहे. काही दिवसांपूर्वी मियाने इस्त्राइल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धावरही आपलं मत मांडलं होत, तसेच तिने पॅलेस्टाइनच्या समर्थनात मत मांडल होत. त्यानंतर तिच्यावर टिका झाली होती. याशिवाय भारतील शेतकरी आंदोलनावरही तिने भाष्य केलं होतं तेव्हाही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Pakistan

  पुढील बातम्या