सुप्रसिद्ध गायक एड शिरीनला पाकिस्तानी मीडियाने म्हटलं '2017ची बेस्ट महिला गायक'

सुप्रसिद्ध गायक एड शिरीनला पाकिस्तानी मीडियाने म्हटलं '2017ची बेस्ट महिला गायक'

आताही त्यांनी असाच काहीसा गोंधळ घातला आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश गायक एड शिरीनला पाकिस्तानी न्यूज चॅनलने महिलाच करुन टाकलं.

  • Share this:

05 मार्च : पाकिस्तानी न्यूज चॅनलचे काही चांगले दिवस चालेत असं दिसत नाही. मागच्याच आठवड्यात पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलवर दोन एँकर ऑन एअर भांडायला लागले. त्यांच्या भांडनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला. आताही त्यांनी असाच काहीसा गोंधळ घातला आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश गायक एड शिरीनला पाकिस्तानी न्यूज चॅनलने महिलाच करुन टाकलं.

हो, ग्रॅमी अवॉर्ड जिंकणाऱ्या एड शिरीनची पाकिस्तानच्या न्यूज चॅनलने बातमी केली. आणि त्या संपूर्ण बातमीमध्ये त्यांनी त्याला तो महिला असल्याचं दाखवलं. त्यामुळे अनेकांनी याचे फोटो काढून ट्विटरवर शेअर केले. त्यात एड शिरीन 2017ची बेस्ट महिला गायक बनली असं लिहण्यात आलं आहे. आणि मग काय, हा फोटो आणि हे कॅप्शन सोशल मीडियावर हवेच्या वेगाने ट्रोल झालं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2018 03:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...