पाकिस्तान सैराट! आता म्हणे प्रियांका चोप्राला सदिच्छा दूत म्हणून काढून टाका कारण...

पाकिस्तान सैराट! आता म्हणे प्रियांका चोप्राला सदिच्छा दूत म्हणून काढून टाका कारण...

प्रियांका चोप्रा राष्ट्रभक्त आहे. तिला UNICEF ची सदिच्छा दूत म्हणून काढून टाका, असं पत्र पाकिस्तानच्या मंत्र्यांनी लिहिलं आहे. काश्मीर प्रश्नावरून सैरभैर झालेल्या पाकिस्तानने उतावळेपणाने वाटेल ते आरोप करणारं हे पत्र UNICEF ला लिहिलं आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 21 ऑगस्ट : टोकाचा राष्ट्रवाद आणि भारत सरकारला जाहीरपणे पाठिंबा दिल्याबद्दल प्रियांका चोप्राला UNICEF च्या गुडविल अँबेसीडर म्हणून राहण्याचा अधिकार नाही, असे तारे पाकिस्तानने तोडले आहेत. एवढंच नाही तर प्रियांका चोप्राला युनिसेफची सदिच्छा दूत म्हणून काढून टाका अशा आशयाचं पत्रही पाकिस्तानी मंत्र्यांनी युनिसेफला पाठवलं आहे.

पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन माझरी यांनी UNICEF चे कार्यकारी संचालक हेन्रिटा फोर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'प्रियांकाची भूमिका, तिचा युद्धाला (अणुयुद्धालासुद्धा) असलेला पाठिंबा दर्शवते. ही भूमिका UN च्या शांतीच्या उद्देशाच्या अगदी विरोधातली आहे. त्यामुळे तिा तातडीने सदिच्छा दूत या पदावरून दूर करावं. जागतिक शांततेसाठीची सदिच्छा दूत या पदाची ती खिल्ली उडवत आहे.'

मोदी सरकारने जम्मू काश्मीरचं विभाजन केलं आणि त्या राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला म्हणून तिथे म्हणे crisis सुरू आहे. काश्मिरी मुस्लिमांची वांशिक हत्या करण्यात येते आहे, असेही आरोप माझरी यांनी त्यांच्या पत्रात केले आहे.

हेही वाचा : पत्नी दिवस रात्र लाडू खायला घालते; पतीने मागितला घटस्फोट!

आसामचा उल्लेख करत तिथेही भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वाला नाकारलं जातंय, असे अकलेचे तारेही या मंत्रीमहोदयांनी तोडले आहेत. काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने स्त्रिया आणि मुलांविरोधात पॅलेट गन्सचा वापर वाढवला असल्याचा बिनबुडाचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.

 हे वाचा : विंग कमांडर अभिनंदन यांचा छळ करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानाचा खात्मा!

भारत सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला पाकिस्तानने कडाडून विरोध केला. पण भारताविरोधात आंतरराष्ट्रीय मतं मिळवण्यात पाकिस्तानला अजिबात यश आलेलं नाही. फक्त चीनने पाकिस्तानची बाजू लावून धरली. तीसुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत टिकली नाही. त्यामुळे आता या ना त्या मार्गाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची कागाळी करायची संधी पाकिस्तान शोधत आहे. आता प्रियांका चोप्राच्या निमित्ताने पाकिस्तानचा उतावळेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

------------------------------------------

VIDEO राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 08:26 PM IST

ताज्या बातम्या