News18 Lokmat

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' शो झाला बंद

या शोविरूद्ध स्मृती इराणींकडे तक्रारही करण्यात आली होती. तसंच अनेक पत्रही लिहिण्यात आली होती

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2017 02:22 PM IST

वादग्रस्त 'पहरेदार पिया की' शो झाला बंद

29 ऑगस्ट: 9 वर्षाच्या मुलाचं आणि 18 वर्षाच्या मुलीचं लग्न दाखवल्यामुळे वादात अडकलेला सोनी टी.व्हीवरचा पहरेदार पिया की हा शो बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कार्यक्रमात 9 वर्षाचा मुलगा आणि 18 वर्षाची मुलगी या दोघांचं हनिमून दाखवल्यामुळे प्रचंड टीका झाली होती.

या शोविरूद्ध स्मृती इराणींकडे तक्रारही करण्यात आली होती. तसंच अनेक पत्रही लिहिण्यात आली होती. अखेर 28 ऑगस्टला हा शो सोनीवर टेलिकास्ट झाला नाही. आधी कौन बनेगा करोडपतीमुळे या शोचे टायमिंग बदलणार असल्याची चर्चा होती. पण आता बीसीसीससीने इशारा दिल्यामुळे हा शो बंद झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी शो बंद झालेला नसून शो आता लिप घेऊन एका नव्या सिझनसोबत परतणार आहे अशी माहिती दिली आहे. हा शो बंद करण्यासाठी change.org या साईटवर कॅम्पेनही चालू करण्यात आलं होतं.

त्यामुळे आता निर्मात्यांच्या म्हणण्याप्रमाणे नवा सिझन येतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2017 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...