मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD Padmini Kolhapure: ‘या’ बोल्ड सीनमुळे वादात अडकली होती मराठमोळी अभिनेत्री

HBD Padmini Kolhapure: ‘या’ बोल्ड सीनमुळे वादात अडकली होती मराठमोळी अभिनेत्री

पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) आपला 55वा वाढदिवस साजरा करत आहेत. बालकलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली.

पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) आपला 55वा वाढदिवस साजरा करत आहेत. बालकलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली.

पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) आपला 55वा वाढदिवस साजरा करत आहेत. बालकलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 01 नोव्हेंबर: बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारी मराठी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure). पद्मिनी यांचा 55वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म मुंबईत 1 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. पद्मिनी कोल्हापुरे 2019 मध्ये रीलिज झालेल्या पानीपत (Panipat) या सिनेमामध्ये झळकल्या होत्या. आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने पद्मिनी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या.

2020मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रवास या मराठी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. या सिनेमामध्ये त्यांच्यासोबतच अशोक सराफ, विक्रम गोखले, शशांक उदापूरकर हे कलाकारही झळकले आहेत. करिअरच्या सुरुवातीला बाल कलाकार म्हणून पद्मिनी यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं होतं. 'जिंदगी', 'ड्रिम गर्ल', 'साजन बिना सुहागन' आणि 'सत्यम शिवम सुंदरम्' या चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारलेले अनेक चित्रपटही चांगलेच गाजले.

View this post on Instagram

#friends #socialdistancing #wayoflife #stayhome #staysafe #staystrong #indiafightscorona @poonam_dhillon_ #goodolddays 💕

A post shared by padminikolhapure (@padminikolhapure) on

बोल्ड सीनमुळे चर्चेत

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा 'गहराई' हा हिंदी सिनेमा 1980 साली रीलिज झाला होता. या चित्रपटामध्ये त्यांनी दिलेल्या बोल्ड सीनमुळे त्या वादातही अडकल्या होत्या. करिअरच्या सुरुवातीच्याच काळात अशाप्रकारचा बोल्ड सीन देणं त्यांच्यासाठीही आव्हानात्मक होतं. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इन्साफ का तराजू' या चित्रपटामध्येही त्यांनी बोल्ड सीन दिला होता. 1982 साली प्रदर्शित झालेल्या 'प्रेम रोग' या चित्रपटासाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही त्यांची भाची लागते. त्या दोघींचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

2013 साली प्रदर्शित झालेल्या फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. चिमणी पाखरं हा त्यांचा मराठी सिनेमा भाव खाऊन केला. 80 ते 90च्या दशकामध्ये त्या बॉक्स ऑफिसवरच्या टॉप अभिनेत्री होत्या. 'आहिस्ता आहिस्ता', 'जमाने को दिखाना है', 'विधाता', सौतन, 'लव्हर्स', 'वो सात दिन' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.

First published:

Tags: Bollywood actress