'पद्मावती'चं ट्रेलर अखेर आज प्रदर्शित

संजय लीला भंसाळी यांचा प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांमुळे चर्चेत असलेल्या पद्मावती या सिनेमाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित झाला. दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत खुलून दिसतेय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2017 01:27 PM IST

'पद्मावती'चं ट्रेलर अखेर आज प्रदर्शित

09 आॅक्टोबर : संजय लीला भंसाळी यांचा प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांमुळे चर्चेत असलेल्या पद्मावती या सिनेमाचा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित झाला. दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत खुलून दिसतेय. दीपिका आणि शाहीद कपूर यांची जोडी प्रथमच या सिनेमातून पडद्यावर आलीय तर खलनायकी अंदाजात प्रथमच दिसतोय रणवीर सिंग. अल्लाउद्दिन खिल्जीची भूमिका रणवीर सिंगने साकारलेय.

चित्तोडचा लढा आणि राणी पद्मावतीचं सौंदर्य, राजा रावल रतन सिंगचं शौर्य  आणि अल्लाउद्दिन खिल्जीचा क्रूरपणा हे सगळं मोठ्या पड्द्यावर पहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.त्याचप्रमाणे यात काही आक्षेपार्ह दृश्य असतील का याचीही चर्चा सुरू आहे.अखेर मोठ्या थाटात ट्रेलर लाँच न करता यावेळी मात्र भंसाळींच्या टीमने सोशल मीडीयाचा आधार घेत ट्रेलर लाँच करणं पसंत केलंय.पाहूया पद्मावतीचं शानदार ट्रेलर-

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2017 01:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...