पद्मावती सिनेमाचं नाव पद्मावत होणार; पुढच्या महिन्यात रिलीज होण्याची शक्यता

पद्मावती सिनेमाचं नाव पद्मावत होणार;  पुढच्या महिन्यात रिलीज होण्याची शक्यता

एकामागोमाग अनेक राज्यांनी या सिनेमावर बंदी घातली होती. आता मात्र सेन्सॉर बोर्डाने पासिंग सर्टिफिकेट नाकारलाय. त्यामुळे आता पद्मावतीच्या रिलीजवर मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे.

  • Share this:

30 डिसेंबर : गेले काही  दिवस वादात असलेल्या पद्मावती सिनेमाला  आता सेन्सॉर बोर्डानेच काही  बदलांसह मंजूरी देण्याचं मान्य केलं आहे. पद्मावतीचं नाव बदलून पद्मावत करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच ही सिनेमा पुढच्या महिन्यात रिलीज होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे.

एकामागोमाग अनेक राज्यांनी या सिनेमावर बंदी घातली होती.

रजपुत राणी पद्मावतीच्या जोहाराच्या कथेवर पद्मावती हा सिनेमा बेतला आहे. ही कथा पद्मावत या काव्यातून घेण्यात आली आहे. त्यामुळेच  बहुतेक सिनेमाचं नाव पद्मावत ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

या सिनेमात राजपूतांना आणि राणी पद्मावतीला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला गेला असून पद्मावती राणीच्या वंशजांनी या सिनेमावर आक्षेप घेतला होता. राजस्थानात करणी सेनेने या विरूद्ध आंदोलनं ही केली होती. मध्य प्रदेश ,राजस्थान ,गुजरात या राज्यांनी या सिनेमांवर आधीच बंदी घतली आहे. या सिनेमाला पास करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने तज्ञांची एक टीम बसवली होती. या टीमने हा सिनेमा पाहिला.  या कमिटीने चित्रपटात काही बदल करण्याची सूचना केली आहे.

आता  थिएटरमध्ये पद्मावती  कधी झळकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading